शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

विटॅमिन्सच्या गोळ्यांचा वापर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 5:00 AM

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९ हजारावर गेली असून मृत्यूचा आकडा १३५ च्या पुढे पोहचला आहे. कोरोनाने शहरी भागासह आता ग्रामीण भागातही आपले पाळेमुळे रोवले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून प्रत्येक जण आपल्यापरिने यातून वाचण्याचा प्रयत्न करीत आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढल्यास कोरोनापासून बचाव होऊ शकतो. त्यामुळे जो-तो यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र रेडिमेटकडे अनेकांचा कल आहे.

ठळक मुद्देकोरोनाची भीती : ग्रामीणच्या तुलनेत शहरी नागरिकांचा अधिक कल, अतिवापर धोकादायक

साईनाथ कुचनकार।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोनाने आपले पाय घट्ट रोवले आहे. या आजाराची बाधा होऊ नये यासाठी बहुतांश नागरिक रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. यामध्ये विटॅमिन्सच्या गोळ्या खाण्याकडे अनेकांचा कल आहे. मात्र अतिरिक्त विटॅमिन्सचा वापर शरीराला धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे या गोळ्या घेण्यापेक्षा दररोज सकस आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९ हजारावर गेली असून मृत्यूचा आकडा १३५ च्या पुढे पोहचला आहे. कोरोनाने शहरी भागासह आता ग्रामीण भागातही आपले पाळेमुळे रोवले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून प्रत्येक जण आपल्यापरिने यातून वाचण्याचा प्रयत्न करीत आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढल्यास कोरोनापासून बचाव होऊ शकतो. त्यामुळे जो-तो यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र रेडिमेटकडे अनेकांचा कल आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेमध्ये शहरी नागरिकांनी विटॅमिन्सच्या गोळ्या नियमित घेण्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून औषधी दुकानातून या गोळ्यांची मागणी झपाट्याने वाढली आहे. यामध्ये विटॅमिन सी, विटॅमिन डी, ए आदींची मागणी अधिक आहे.डॉक्टरांच्या सल्लानुसार, एखाद्या रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते किंवा रुग्ण भोजन करीत नाही. अशावेळी त्याला विटॅमिन्सच्या गोळ्या दिल्या जाते. यातून रोगाशी लढण्यासाठी त्याच्या शरीराला तयार केले जाते. मात्र सुदृढ व्यक्तीने अतिरिक्त विटॅमिन्सच्या गोळ्या सेवन केल्यास त्याचा शरीरावर विपरीत परिणाम पडू शकतो.त्यामुळे शक्यतो गोळ्या घेणे टाळले पाहिजे.नागरिकांमध्ये संभ्रमरोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी नागरिक विटॅमिन्सच्या गोळ्या घेत आहेत. मात्र फायद्यापेक्षा नुकसान अधिक आहे. विटॅमिसच्या गोळ्या घेतल्यामुळे कोरोना आजार होत नाही. हा नागरिकांचा संभ्रम आहे. रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवणे आवश्यक आहे. मात्र नियमानुसार राहणेही गरजेचे आहे.कोरोनाला दूर ठेवण्यासाठी हे कराकोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिक विटॅमिन्सच्या गोळ्याकडे वळले आहे. मात्र यातून बाधा होणार नाही, याची शक्यता कमी आहे. कोरोनाला दूर ठेवायचे असेल तर प्रत्येकांनी मास्क, सॅनिटायझर, देहदूरी, रस्त्यावर न थुंकणे, अपप्रचाला बळी न पडने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेणे आदी करणे गरजेचे आहे.एखाद्या रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी विटॅमिन्सच्या गोळ्या दिल्या जाते. मात्र याचा वापर मापक असायला हवा. अतिरिक्त वापर केल्यास धोकादायक ठरू शकते. त्यामुळे प्रत्येकांनी सकस आहाराकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच प्रत्येकांनी औषधोपचार घ्यावा. विटॅमिन्सच्या गोळ्या घेतल्याने कोरोना होणार नाही, हा गैरसमज आहे. मॉस्क, सॅनिटायझर, देहदुरी याकडे विशेष लक्ष दिल्यास कोरोनावर मात करता येऊ शकते.-डॉ. अशोक वासलवार, हृदयरोगतज्ज्ञ, चंद्रपूरसकस आहाराकडे द्या लक्षरोगप्रतितिकार शक्ती वाढविण्यासाठी दररोज नियमित सकस आहार घेतला पाहिजे. आहारानुसार नियमित व्यायाम करायला हवा. भोजनामध्ये शरीराला विटॅमिन्स मिळेल, असे कडधान्य, फळांचे सेवन करायला हवे. यासोबतच पुरेशी झोपही आवश्यक आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या