सिकलसेल आजाराचे प्रमाण वाढले
By Admin | Updated: October 29, 2014 22:47 IST2014-10-29T22:47:52+5:302014-10-29T22:47:52+5:30
जिल्ह्यात सिकलसेलच्या आजाराचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहे. २ हजार १४ रुग्णांना दर महिन्याला रक्त बदल करावे लागते. मागील सहा वर्षात ३७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, २० हजारावर रुग्ण

सिकलसेल आजाराचे प्रमाण वाढले
चंद्रपूर : जिल्ह्यात सिकलसेलच्या आजाराचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहे. २ हजार १४ रुग्णांना दर महिन्याला रक्त बदल करावे लागते. मागील सहा वर्षात ३७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, २० हजारावर रुग्ण या आजाराने बाधित आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची भिती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.
२००९ ते आॅगस्ट २०१४ च्या आकडेवारीनुसार २० हजार ३६० एएस सिकलसेलचे रुग्ण, तर एसएसचे २ हजार १४ रुग्ण आहेत. यात महिला व पुरुषांचा समावेश आहे. वाहन व्यक्ती पुढच्या पिढीला सिकलसेलचा आजार देऊ शकतात. पण त्यांचे प्रमाण खूपच कमी असते. याला पिडीत व्यक्तीसारखा त्रास होत नाही. मात्र दोन्ही वाहक व्यक्तीने विवाह केला तर त्यापासून जन्माला येणारी संततीला सिकलसेल होऊ शकतो. मागील वर्षात सिकलसेलमुळे ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रक्ततपासणीतून या आजाराचे निदान करता येते. या रुग्णांना आयुष्यभर औषधोपचार करावे लागतात. हा आजार आनुवंशिक असल्याचेही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सिकलसेलविषय अनेक गैरसमज समाजात पसरले आहे. ते दूर होणे गरजेचे आहे. या आजाराविषयीच्या जनजागृतीसाठी आरोग्य विभागातर्फे गावस्तरावर शिबिर घेतली जातात. शिबिरात रक्तचाचणीही होते. स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ही कामे केली जातात. १९ जून हा जागतिक सिकलसेल दिन असतो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिबिरे घेण्यात येतात. जिल्ह्याची लोकसंख्या २४ लाखाच्या जवळपास आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी सिकलसेल रक्त चाचणी करुण घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. जर १०० व्यक्तींची रक्तचाचणी केल्यास तीन आजारी व्यक्ती तर १५ वाहक व्यक्ती असू शकतात, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्रत्येकांनी चाचणी करून औषधोपचार सुरु करावा, अशी विनंती करण्यात आली. आहे. (नगर प्रतिनिधी)