घुग्घुस : जिल्ह्यात दारूबंदी असूनही घुग्घुस शहराजवळील विविध मार्गाने दारू तस्करी सुरू आहे. पोलिसांकडून कारवाई केल्यानंतरही मद्यपी यवतमाळ व वणी येथे जात आहेत. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नेहरूनगरातील नाली
बांधकाम पूर्ण करावे
चंद्रपूर : नेहरूनगर रय्यतवारी परिसरात नाली बांधकाम रखडले. विविध वार्डात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरातील लोकसंख्या वाढत आहे. नागरी सुविधांमध्येही वाढ करणे गरजेचे झाले. महानगरपालिका प्रशासनाने निधीची तरतूद करून नाली बांधकाम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
क्रीडांगणासाठी जागा आरक्षित करा
सावली : शहरात शाळा व महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांचे प्रमाण बरेच आहे, पण क्रीडांगण नाही. युवक व बालकांना खेळण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने तालुका क्रीडांगणासाठी जागा आरक्षित करण्याची मागणी युवकांनी केली आहे.
प्रवासी निवाऱ्याअभावी नागरिक हैराण
राजूरा : शेवटच्या टोकावर असलेल्या निमणी व हिरापूर येथे प्रवाशांसाठी निवारा शेड नसल्याने प्रवाशांचे हाल होतात. निमणी, हिरापूर गावांसाठी राजुरा, निमणी, गडचांदूर अशी बससेवा उपलब्ध आहे. मात्र, चंद्रपूर, राजुरा, गडचांदूर येथे प्रवास करण्यासाठी निमणी, हिरापूर येथील चक्क रस्त्यावरच बसची वाट पाहत उभे राहावे लागते.