कोरोना उपाययोजनांची व्याप्ती वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 05:00 AM2020-04-07T05:00:00+5:302020-04-07T05:01:25+5:30

आतापर्यंतच्या १५ दिवसात ज्याप्रमाणे कोरोनापासून बचावाच्या आपण यशस्वी ठरलो. पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मनपाने नागरिकांच्या बचावासाठी उपाययोजनांची व्याप्ती वाढवावी, अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या. मनपा अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीत ते बोलत होते.

Increase the scope of corona solutions | कोरोना उपाययोजनांची व्याप्ती वाढवा

कोरोना उपाययोजनांची व्याप्ती वाढवा

Next
ठळक मुद्देबाळू धानोरकर : मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्र्रपूर : शहरासह जिल्ह्यात एकाही व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण होऊ नये, याकरिता प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. आतापर्यंतच्या १५ दिवसात ज्याप्रमाणे कोरोनापासून बचावाच्या आपण यशस्वी ठरलो. पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मनपाने नागरिकांच्या बचावासाठी उपाययोजनांची व्याप्ती वाढवावी, अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या. मनपा अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त गजानन बोकडे, शहर अभियंता महेश बारई, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती रामू तिवारी आदी उपस्थित होते. खासदार धानोरकर म्हणाले, देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकही रूग्ण आढळला नाही, ही समाधानाची बाब आहे. मात्र, या भीषण समस्येपासून यापुढेही बचाव करण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे. लॉकडाऊनमध्ये संकटात अडकलेल्या नागरिकांना सरकारकडून मदत केल्या जात आहे. सामाजिक संघटनांनीही याकरिता पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी नमुद केले. रस्त्यावर विकणाºया भाजीपाला व फळ विक्रेत्यांना मास्क व सॉनिटायझर वितरित करावे, कोहिनुर तलावात भाजी मार्केटला अडचणी येत असेल तर चांदा क्लब सुरू करावा, गर्दीमुळे सोशल डिस्टंन्सिंगचे उल्लंघन होणार नाही. घंटागाडी व वार्डात भाजी विक्री करणारे हातठेलेधारकांसाठी सकाळी ८ ते ११ अशी वेळ ठेवण्याचा विचार करावा, अशा सूचना खासदार धानोरकर यांनी महानगर पालिका प्रशासनाला दिल्या. आयुक्त मोहिते यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली.

यंत्रणा गतिमान करावी-किशोर जोरगेवार
कोरोना विरोधातील लढ्यात नागरिकांकडून प्रशासनाला सहकार्य करत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्याही जबाबदाऱ्या वाढल्या आहे. मात्र महानगर पालिका विरोधात काही तक्रारीही आल्या. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेवटच्या गरजू नागरिकांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी यंत्रणा गतिमार करावर, अशी सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. मनपाकडून शहरात सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Increase the scope of corona solutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.