पडोली-घुग्घुस महामार्गावर खड्डयांमुळे अपघातात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST2020-08-23T05:00:00+5:302020-08-23T05:00:45+5:30
रस्त्याची साफसफाई, वृक्षलागवड, खराब झालेल्या (क्षतीग्रस्त) डांबरीकरण रस्त्याची दुरुस्तीची कामे आयव्हीआरसीएल कंपनीने करायची आहे. मात्र कंपनी वणी-धानोरा व करंजी रस्त्यावर टोलनाके बनवून वाहनांकडून टोल वसुली करीत आहे. मात्र रस्ता दुरुस्ती, वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष करीत आहे, असा नागरिकाचा आरोप आहे.

पडोली-घुग्घुस महामार्गावर खड्डयांमुळे अपघातात वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : पडोली-घुग्घुस-वणी-करंजी महामार्गाचे चौपदरीकरण आयव्हीआरसीएल कंपनीने केले. धानोरा, वणी, करंजी येथे टोल नाके उभारून वाहनधारकांकडून वसुली सुरू आहे. मात्र रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने जागोजागी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मागील सहा महिन्यांपूर्वी सदर खड्डे बुजवले. मात्र वर्तमान स्थितीत परत जैसे से स्थिती बनली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. पावसाचे पाणी खड्ड्यात साचून राहत असल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत.
खासगीकरणांच्या माध्ययमातून बांधा-वापरा व हस्तांतरित करा, या तत्वावर पडोली, घुग्घुस, वणी, करंजी रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम आयव्हीआरसीएल या कंपनीने केले. त्यात घुग्घुसपर्यत तर वणीपर्यत डांबरीकरण करण्यात आले.
रस्त्याची साफसफाई, वृक्षलागवड, खराब झालेल्या (क्षतीग्रस्त) डांबरीकरण रस्त्याची दुरुस्तीची कामे आयव्हीआरसीएल कंपनीने करायची आहे. मात्र कंपनी वणी-धानोरा व करंजी रस्त्यावर टोलनाके बनवून वाहनांकडून टोल वसुली करीत आहे. मात्र रस्ता दुरुस्ती, वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष करीत आहे, असा नागरिकाचा आरोप आहे. सहा महिन्यांपूर्वी येथील सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्धीकी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा यांच्याकडे तक्रार करून रस्त्यावरील खड्डयाची दुरुस्ती व वृक्ष लागवड करण्याची विनंती केली. त्यावेळी दुरुस्तीचे काम केले. मात्र दोन महिन्यांत परत रेल्वे लाईन गेटवर घुग्घुस पडोली डांबर रस्त्यावर ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले. यामुळे वारंवार अपघात घडत आहे. त्यामुळे पडोली- घुग्घुस-वर्धा नदी बेलोरापर्यत चौपदरीकरणाच्या डांबरी रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ईबादुल सिद्धिकी यांनी केली आहे.