शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

By admin | Updated: February 6, 2016 00:54 IST

नागपूर विभागीय महसूल क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते शुक्रवारी क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आले.

चंद्र्रपूर : नागपूर विभागीय महसूल क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते शुक्रवारी क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आले. जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या या उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, आमदार नाना शामकुळे, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण, महसूल उपआयुक्त प्रदीपकुमार डांगे, सहआयुक्त सुधाकर कुळमेथे, अपर जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी विभागीय क्रीडा स्पर्धा चंद्र्रपूरमध्ये आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. महसूल विभागीतील कर्मचाऱ्यांना प्रशासकीय काम हाताळताना टिमवर्कची आवश्यकता असते असे सांगून खेळामध्येसुध्दा सांघिक भावना जोपासली जाते. याचाच फायदा आपण प्रशासकीय काम करताना घ्यावा व आनंददायी जीवनाचा मूलमंत्र खेळातून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी डॉ.म्हैसेकर म्हणाले, महसूल विभागात काम करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. या विभागाच्या अंतर्गत विविध समित्यांचे दायित्व स्विकारताना अनेकदा त्याचा मानसिक ताण कर्मचाऱ्यांवर पडत असतो. जोपर्यंत शारीरिक व मानसिकदृष्ट्या आपण सुदृढ राहणार नाही, तोपर्यंत प्रशासकीय कामाची गती वाढणार नाही. त्यामुळेच खेळातून या समस्याची उकल होऊ शकते. खेळातून सांघिक भावना, शिस्त, जिद्द इत्यादी बाबी आत्मसात होतात व आपण शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी राहू शकतो. खेळासोबत योग साधनेव्दारे कर्मचाऱ्यांनी मानसिक संतुलन टिकवण्याचे प्रयत्न करावे, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले.यावेळी आ. नाना शामकुळे यांनीही खेळाचे महत्त्व विषद करुन सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. नागपूर विभागाचे महसूल उपआयुक्त प्रदीपकुमार डांगे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी महसूल क्रीडा पुस्तिकेचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे यांनी केले तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने यांनी मानले. ७ फेब्रुवारीपर्यंत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू राहील. (प्रतिनिधी)