अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:29 IST2021-01-03T04:29:27+5:302021-01-03T04:29:27+5:30
अंकुश मनोहर दिघोरे रा. जनकापूर असे आरोपीचे नाव आहे. २७ जानेवारी २०१८ रोजी आरोपीने शेजारी राहणाऱ्या फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला कारावास
अंकुश मनोहर दिघोरे रा. जनकापूर असे आरोपीचे नाव आहे. २७ जानेवारी २०१८ रोजी आरोपीने शेजारी राहणाऱ्या फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला पैसे देण्याचे आमिष देऊन घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला. याबाबतची तक्रार फिर्यादीने नागभीड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. गुन्हा तपासात घेऊन तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयाने सुनावणीदरम्यान साक्षीदार तपासून योग्य पुराव्याच्या आधारे अंकुश दिघोर याला एक वर्ष शिक्षा व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिने शिक्षा, कलम ३५४ (ब) अंतर्गत चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांची शिक्षा, कलम ५११ अन्वये पाच वर्षे शिक्षा व दोन हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश केदार यांनी ठोठावली. सरकारतर्फे ॲड. एस. बी. नागपुरे, कोर्ट पैरवी म्हणून दिनकर गौरकार यांनी भूमिका बजावली.