जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:37 IST2019-04-21T00:36:52+5:302019-04-21T00:37:39+5:30
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून परत जात असताना तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्या सर्व कर्मचाºयांच्या कुटुंबीयांना तातडीने भरपाई देण्याची मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून परत जात असताना तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्या सर्व कर्मचाºयांच्या कुटुंबीयांना तातडीने भरपाई देण्याची मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
लोकशाहीच्या उत्सवाचा भाग म्हणून पहिल्या टप्प्यातील निवडणूक ११ एप्रिलला पार पडली. या टप्प्यातील निवडणूक कर्मचाºयांनी यशस्वी करून दाखवली. मात्र कर्तव्य निभावणाºया कर्मचाºयांना रस्ता अपघातात जीव गमवावा लागला तर काही कर्मचारी गंभीर जखमी झाले. काहींची मृत्युशी झुंज सुरू आहे. ठिकठिकाणी झालेल्या अपघातात मंगेश देविदास कोथळे रा. पालेबारसा, विजय बहुरूपी, राणी चित्रलेखा, भोसले हायस्कूल खैरीबुटी ता. उमरेड जि. नागपूर यांचा समावेश आहे. या कर्मचाºयांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी संघटनेने केली. शासकीय कर्तव्य पार पडताना शासनाने मदत देण्यास दिरंगाई केली. त्यामुळे कुटुंंबीयांना संकटांचा सामना करण्याची वेळ आली आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची मागणी संघटनेने केली. निवेदन देताना तालुका अध्यक्ष हरिदास डांगे, उपाध्यक्ष बालाजी दमकोंडवार, कार्याध्यक्ष प्रा. प्रशांत मत्ते, कोषाध्यक्ष अनंता ढोरे, मंगेश नंदेश्वर, माजी तालुका अध्यक्ष दीपक सेमस्कर व संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थितीत होते. संघटनेच्या वतीने मंगेश कोथुले यांना पाच हजार रूपयांची मदत देण्यात आली.