अवैध दारू तस्करी करणारे पोलिसांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:11 IST2021-05-04T04:11:36+5:302021-05-04T04:11:36+5:30

वढोली : कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्नशील असलेल्या पोलीस विभागाच्या डोळ्यात धूळ झोकून अवैध दारु तस्करी करीत असताना एकाच दिवशी गोंडपिपरी ...

Illegal liquor smugglers on police radar | अवैध दारू तस्करी करणारे पोलिसांच्या रडारवर

अवैध दारू तस्करी करणारे पोलिसांच्या रडारवर

वढोली : कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्नशील असलेल्या पोलीस विभागाच्या डोळ्यात धूळ झोकून अवैध दारु तस्करी करीत असताना एकाच दिवशी गोंडपिपरी पोलिसांनी पाच ठिकाणी कारवाई केल्याने दारू तस्करांचे धाबे दणाणले आहे.

सद्यस्थितीत पोलीस कर्मचारी कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्नात असल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी व्यस्त असतात. हिच संधी साधून अवैद्य दारू विक्रेते दारू तस्करी करीत आहेत. अशातच शनिवारी दरूर घाटावर दोन कारवाया,चेकदरूर घाटावर १ कारवाई, भंगाराम तळोधी येथील २ हातभट्टीवर एकाच दिवशी शनिवारी ठाणेदार संदीप धोबे, पीएसआय धर्मराज पटले यांनी सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत या कारवाया केल्या. या प्रकरणात अनिकेत रायपुरे, निखिल रायपुरे, रेकचंद रायपुरे, अमित तेलसे सर्व रा. फुर्डी हेटी, मलेश मोहुर्ले, नवीन इरगिला रा.शिरपूर, गोलू सिडाम, संतोषी चंद्रगिरीवार, किशोर पेंदोर तिघेही रा. भंगाराम तळोधी या आरोपींवर गुन्हा दाखल करून तीन लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Web Title: Illegal liquor smugglers on police radar