अवैध दारु विक्री व अनिर्बंध वाहतुकीने नागरिक त्रस्त

By Admin | Updated: September 15, 2014 00:02 IST2014-09-15T00:02:48+5:302014-09-15T00:02:48+5:30

कोरपना शहरासह परिसरात चालणाऱ्या अवैध धंद्यांना आळा घालण्याचा पुरेसा प्रयत्न पोलीस व संबंधित विभाग करीत नसल्याचे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ठाणेदाराची बदली

Illegal ammunition and uninterrupted traffic suffer civilians | अवैध दारु विक्री व अनिर्बंध वाहतुकीने नागरिक त्रस्त

अवैध दारु विक्री व अनिर्बंध वाहतुकीने नागरिक त्रस्त

कोरपना : कोरपना शहरासह परिसरात चालणाऱ्या अवैध धंद्यांना आळा घालण्याचा पुरेसा प्रयत्न पोलीस व संबंधित विभाग करीत नसल्याचे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ठाणेदाराची बदली झाल्यानंतर येणारे नवे ठाणेदार अनिर्बंध वाहतूक, अवैध दारू विक्री आणि गुन्हेगारीवर प्रभावीपणे अंकुश लावतील, अशी अपेक्षा केली जाते. परंतु पदरी नेहमीच निराशा येते, असा येथील जनतेचा अनुभव आहे.
अतिसंवेदनशील आंध्रा सीमेलगत असलेला कोरपना तालुक्यात सर्वत्र अवैध धंद्याना उत आला आहे. यावर आळा बसावा, अशी परिसरातील जनतेची मागणी आहे. पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकून अनेक अवैध व्यवसायिक बेधडकपणे अवैध व्यवसाय करीत आहेत. तालुक्यात वनसडी गावालगतच्या देशी दारुच्या दुकानातून दररोज भरदिवसा दुचाकी वाहनाने परसोडा फाटा, मांडवा, कोरपना, तांबाडी फाटा अशा अनेक गावांमध्ये दारु पोहचविली जात आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील मुकूटबन येथील नदी पात्रातून वणी तालुक्यातील दारू कोरपना तालुक्यात पोहचविली जात आहे. या तालुक्यात सावकारी, जुगार, केरोसीनचा काळा बाजार गॅस सिलेंंडरचा अवैध वापर, खताची तस्करी, सुगंधीत तंबाखुची तस्करी असे एक ना अनेक अवैध धंदे बोकाळले आहेत. मात्र प्रशासनाला याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसते. कोरपना परिसरात सणाच्या व बंदच्या दिवशी सर्रासपणे देशी व विदेशी दारु विकली जाते. या अवैध दारु विक्री मुले शेकडो कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. मात्र पोलिसांचा आशिर्वाद असल्याने मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारु विक्री होत आहे.
कोरपना, वणी, गडचांदूर येथून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये सर्रास केरोसीनचा वापर केल्या जात आहे. मात्र गरजू नागरिकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवून जास्त भावाने वाहतूक करणाऱ्या वाहनांना केरोसीन विकले जात आहे. असे चित्र कोरपना तालुक्यात असतानासुद्धा पोलीस विभाग सुस्त आहे. तीनचाकी वाहनामध्ये १५ ते २० प्रवासी बसविले जातात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. याची जाणिव असुनही पोलीस यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
पररसोडा माईन्सची अनेक वाहने तसेच गिट्टी व रेतीची वाहतूक करणारी वाहने ओव्हरलोड असतात. ुपरिणामी मुख्य मार्गाची दैनावस्था झाली आहे. अपघातही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या अपघातात अनेक दुचाकी वाहनस्वारांना जीव गमवावा लागला. या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी कोणतीही उपाययोजन केली जात नाही. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये कोरपना, गडचांदूर महामार्गावर अनेक अपघात झालेत. जड वाहतुकीमुळे अनेकांचे बळी गेले. मात्र जडवाहनांच्या अनिर्र्बंध वाहतुकीला पायबंंध बसला नाही. गडचांदूर ते कोरपना मार्गावर चालणाऱ्या अवैध प्रवासी वाहनांवर अल्पवयीन मुले चालक म्हणून काम करीत आहेत. काही जणांकडे तर चक्क वाहन चालविण्याचा परवानासुद्धा नाही. अनेक वाहनांना ब्रेक लाईट नाही. काही वाहने भंगार अवस्थेत असल्याने अपघात घडून त्यात निरपराधांचा बळी जाण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Illegal ammunition and uninterrupted traffic suffer civilians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.