शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव योजना पूर्णत्वास तर मग पाणी का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 14:16 IST

नागरिकांचा सवाल : शहरासाठी पुरेशी नाही तपाळ पाणीपुरवठा योजना

लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या नगरपरिषदेच्या ३१ कोटी रुपये किमतीच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पिण्याचे पाणी का नाही, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

नागभीड नगरपरिषदेची स्थापना ११ एप्रिल २०१६ रोजी झाली. नगरपरिषदेत परिसरातील ११ गावांचा समावेश करण्यात आला. उन्हाळ्यात या गावात दरवर्षी पाण्याची मोठी टंचाई असते. नागभीड शहरालाही तपाळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो. तपाळ पाणीपुरवठा योजना १९९९ मध्ये अस्तित्वात आली. वर्तमान परिस्थितीत नागभीडला पाणीपुरवठा करण्यास तपाळ योजना असमर्थ ठरत आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात शहरात आणि नगरपरिषदेत समावेश गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन नागभीड नगरपरिषदेने या नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार शासनाकडे सादर करण्यात आले.

गळतीने पाणीपुरवठा ठप्पउन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची पातळी खालावली. अशा परिस्थितीत नागभीडला पाणीपुरवठा करणारी तपाळ पाणीपुरवठा योजनाच मदतीला आहे. मात्र, भिकेश्वरजवळील गळतीने सोमवारपासून पुरवठा बंद झाला. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरू झाल्याचे दिसून येत आहे 

टंचाईच्या काळात भ्रमनिरासघोडाझरी तलावातून ही योजना कार्यान्वित होणार आहे. नगरपरिषद क्षेत्रातील सर्व गावांत २६ किमी पाइपलाइन आहे. योजनेत ९ पाण्याच्या टाकी आहेत. या टाक्यांचे काम पूर्ण झाले. जलशुद्धीकरण केंद्र व गावातील पाइपलाइन पूर्ण झाले. गावातील नळजोडण्यांचेही काम पूर्ण झाले. मग योजना कार्यान्वित करण्यास अडचण कोणती, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. उन्हाळ्यात नवीन योजनेचे पाणी मिळेल, अशी नागभीडकरांची अपेक्षा होती. मात्र, भ्रमनिरास झाला आहे.

तीन टँकरने पाणीपुरवठा गळतीमुळे तपाळ योजना बंद झाल्याने शहरात टंचाई निर्माण झाली. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे, म्हणून नगरपरिषदेने शहरात तीन टँकर लावले, पण अनेकांना पाणी मिळत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. 

नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचे काम जोमाने सुरू आहे. मात्र, राममंदिर चौक, रेल्वे क्रॉसिंग आणि पोलिस ठाण्याच्या जवळ काही बांधकाम अद्याप शिल्लक आहे. हे काम झाल्यानंतर योजना कार्यान्वित केली जाईल.- उमेश शेंडे, अभियंता, न.प. नागभीड. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातchandrapur-acचंद्रपूर