रस्त्यावर कोणी विनाकारण वाद घालत असेल, तर सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:30 IST2021-09-21T04:30:47+5:302021-09-21T04:30:47+5:30

दिवसेंदिवस लूटमार करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरण्यात येत असल्याचे प्रकार दिसून येत आहेत. याला अनेक ज्येष्ठ बळी ठरत आहेत. एक ...

If someone is arguing on the street for no reason, beware! | रस्त्यावर कोणी विनाकारण वाद घालत असेल, तर सावधान!

रस्त्यावर कोणी विनाकारण वाद घालत असेल, तर सावधान!

दिवसेंदिवस लूटमार करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरण्यात येत असल्याचे प्रकार दिसून येत आहेत. याला अनेक ज्येष्ठ बळी ठरत आहेत. एक कंम्पू तयार करून, बँकेच्या परिसरात किंवा गर्दीच्या ठिकाणी रेकी करीत असतात. त्यानंतर, त्या व्यक्तीला टक्कर मारून किंवा काहीतरी क्षुल्लक कारणावरून वाद घालत असतात. त्यानंतर, त्याची लूट करतात. असे अनेक प्रकार मोठ्या शहरात उघडकीस आले आहे. त्यामुळे सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

बॉक्स

काय काळजी घ्याल?

बँकेतून कॅश नेताना ती व्यवस्थित सांभाळून न्यावी, कोणतीही व्यक्ती आपणाला काही खाण्यासाठी पदार्थ देत असेल, तर तो टाळावा, कोणत्याही व्यक्तीची आपण मदत मागितली नसताना, तो स्वत:हून आपणाला मदत करण्यास येत असल्यास सतर्कता बाळगावी. मोठी कॅश नेत असताना, कुठेही थांबून गप्पा मारत बसू नये.

बॉक्स

अनेकांची होतेय लूट

अनेक ज्येष्ठांशी क्षुल्लक कारणातून वाद घालून त्याची लूट करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या असे प्रकार उघडकीस आले नसले, तरी सतर्क असे गरजेचे आहे. नागपूर, मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरात असे प्रकार मोठ्या प्रमाणात उघडकीस आले आहेत.

बॉक्स

असे तुमच्याही बाबतीत घडू शकते

१) एक व्यक्ती बँकेतून जात असताना, एका युवकाने त्याला धक्का दिला. या छोट्याशा कारणावरून त्याच्या वाद सुरू झाला. दरम्यान, तेथे आणखी काही युवक आले. एकाने संधी साधून हातातील पैशाची बॅग घेऊन त्यांनी पळ काढला.

२) एका ज्येष्ठ व्यक्तीला बँकेतच तुमची कॅश मोजून देऊ का, म्हणून सहकार्य करण्याची भूमिका दाखविली. त्यावेळी त्याने होकार देताच, तो पैसे मोजू लागला. काही क्षणात त्याने पैसे बरोबर असल्याचे सांगून परत केले. मात्र, घरी गेल्यानंतर पैसे कमी आढळले.

Web Title: If someone is arguing on the street for no reason, beware!