तिसऱ्या लाटेची घंटा वाजलीच तर कोरोनाविरुद्ध लढण्याची तयारी कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 05:00 IST2021-07-18T05:00:00+5:302021-07-18T05:00:30+5:30

चंद्रपूर जिल्ह्यात कोविडबाधित मृतांच्या संख्येला ब्रेक लावण्यात प्रशासनाला यश आले. कोरोना प्रतिबंधक उपचार करण्यासाठी पायाभूत सुविधांचीही व्याप्ती वाढली. त्यामुळे नागरिकांनी भयभीत होण्याचे कारण नाही, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. राज्याच्या कोविड १९  टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी  सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात तिसरी लाट येईल. ही लाट पहिल्यापेक्षा जास्त तीव्र असेल. पण, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत गंभीर नसेल, असा इशारा माध्यमांमध्ये दिला आहे.

If the bell of the third wave rings, where is the preparation to fight against Corona? | तिसऱ्या लाटेची घंटा वाजलीच तर कोरोनाविरुद्ध लढण्याची तयारी कुठे ?

तिसऱ्या लाटेची घंटा वाजलीच तर कोरोनाविरुद्ध लढण्याची तयारी कुठे ?

ठळक मुद्देनागरिकांचा प्रश्न : २५०० ऑक्सिजन बेड्स, ८५० आयसीयू व ४२५ व्हेंटिलेटरचे नियोजन

राजेश मडावी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाबाधितांची संख्या घसरू लागल्याने नागरिक निश्चिंत होऊन दैनंदिन व्यवहारात गुंतले असतानाच आता नव्या चिंतेने भर टाकली. गत दोन आठवड्यांपासून कोविड रुग्णांची संख्या दररोज १५ पेक्षा जास्त होऊ लागली. जिल्हा प्रशासनाने लागू केलेले निर्बंध कायम असतानाच रुग्णवाढ होत असल्याने दोन-तीन महिन्यात तिसरी लाट येण्याची चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी कशी आहे, हा प्रश्नही आता ऐरणीवर आला आहे. 
चंद्रपूर जिल्ह्यात कोविडबाधित मृतांच्या संख्येला ब्रेक लावण्यात प्रशासनाला यश आले. कोरोना प्रतिबंधक उपचार करण्यासाठी पायाभूत सुविधांचीही व्याप्ती वाढली. त्यामुळे नागरिकांनी भयभीत होण्याचे कारण नाही, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. राज्याच्या कोविड १९  टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी  सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात तिसरी लाट येईल. ही लाट पहिल्यापेक्षा जास्त तीव्र असेल. पण, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत गंभीर नसेल, असा इशारा माध्यमांमध्ये दिला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत बाधितांचे जीव वाचविणे आणि रुग्णालयात दाखल होण्याची परिस्थितीच येऊ नये. सौम्य अथवा लक्षणविरहित रुग्णांवर घरच्या घरी तसेच गंभीर रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून देणे,  अधिकाधिक नागरिकांचे कोविड प्रतिबंधक  लसीकरणासाठी  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासनाकडून नियोजन व अंमलबजावणी केली जात आहे. 

लहान मुलांसाठीही केअर सेंटर  
- तिसऱ्या लाटेचा अंदाज गृहीत धरून लहान मुलांसाठीही केअर सेंटर्स सज्ज ठेवण्यात आले. म्युकरमायकोसिसचाही धोका वाढू नये, यासाठी हॉस्पिटल्समध्ये विशेष कक्ष तयार आहेत. तालुकास्थळ व नगरपंचायत स्तरावर ऑक्सिजन प्लांटसाठी नुकत्याच निविदा प्रकाशित करण्यात आल्या

तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या  २० हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज ?
- तिसऱ्या लाटेची  सध्या तरी शक्यता नाही. मात्र, लाट आलीच तर रुग्णांची संख्या सुमारे २० हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज गृहीत धरण्यात आला आहे.
- त्यानुसार कोविड केअर सेंटरमध्ये ९ हजार रुग्ण राहू शकतात. २५०० ऑक्सिजन बेड्स, ८५० आयसीयू तर ४२५ व्हेंटिलेटर बेड्स लागू शकतात. या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करून ठेवण्यात आले आहे.

कोविड केअर सेंटरमध्ये ४ हजार रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता
सध्या जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये ४ हजार रुग्णांवर उपचार करण्याची,  क्षमता आहे. १ हजार ३०० ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड्स १०५ आहेत. त्यातील ९४ व्हेंटिलेटर कार्यरत आहेत. जिल्ह्यातून ५० व्हेंटिलेटर आयुक्त ८० व्हेंटिलेटर  वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मागविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला. यापैकी २४ व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. कोविड उपायांबाबत  प्रशासनाकडून सातत्याने आढावा घेणे सुरू आहे.

५६.३४ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध  
शासनाने सूचविल्याप्रमाणे लिक्विड  ऑक्सिजनची ५७ मेट्रिक टन गरज असून सध्या ५६.३४ मेट्रिक टन उपलब्ध आहे. पीएसए ऑक्सिजन १६ मेट्रिक टन हवा तो आता १५ मेट्रिक टन आहे. सिलिंडर ऑक्सिजन ८ मेट्रिक टन पाहिजे सध्या १० मेट्रिक टन उपलब्ध आहे. जम्बो केअर सेंटरमध्ये २०० बेड्स, पॉलिटेक्निकमध्ये २०० तर ग्रामीण रुग्णालयात ४७५ वाढीव बेड्स उपलब्ध होतील. मूल येथे ५० बेड्सची पाइपलाइन अंतिम टप्प्यात आहे.

 

Web Title: If the bell of the third wave rings, where is the preparation to fight against Corona?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.