वरोरा शहरालगतच्या श्रीनगर सिटी परिसरात मूर्तीची विटंबना

By Admin | Updated: August 19, 2015 01:18 IST2015-08-19T01:18:06+5:302015-08-19T01:18:06+5:30

शहरालगतच्या श्रीनगर सिटी मधील मोकळ्या जागेत असलेल्या हनुमान मंदिरासमोर ठेवण्यात आलेल्या मूर्तीची विटंबना झाल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला.

The idol of idol in Srinagar city area of ​​Warora city | वरोरा शहरालगतच्या श्रीनगर सिटी परिसरात मूर्तीची विटंबना

वरोरा शहरालगतच्या श्रीनगर सिटी परिसरात मूर्तीची विटंबना

वरोरा: शहरालगतच्या श्रीनगर सिटी मधील मोकळ्या जागेत असलेल्या हनुमान मंदिरासमोर ठेवण्यात आलेल्या मूर्तीची विटंबना झाल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विटंबना झालेल्या मूर्तीची विधीवत पूजा करुन स्थापना करण्यात आली. यावेळी घटनास्थळानजीक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
वरोरा शहरालगतच्या बोर्डा ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणाऱ्या श्रीनगर सीटी वसाहतीमध्ये मारोती काळे यांच्या शेतातील मोकळ्या जागेत हनुमानाचे मंदिर आहे. त्या मंदिरा समोरील ओट्यावर काही मूर्ती बसविण्यात आल्या आहेत. परिसरातील नागरिक या मंदिरात पूजा करीत असतात. मंदिराला २४ वर्षे पूर्ण झाली आहेत. १८ आॅगस्ट रोजी सकाळी ५ वाजताच्या सुमारास विनोद काळे मंदिरात पूजा करण्यासाठी गेले असता मूर्तीच्या विटंबनेचा प्रकार त्यांना दिसला. त्यांनी परिसरातील नागरिकांना व वरोरा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.
नागरिकांच्या सहकार्याने विधीवत पूजा करुन मूर्तीची स्थापना करण्यात आली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जयस्वाल, पोलीस निरीक्षक विलास चव्हाण यांनी भेट देवून पाहणी केली. याच परिसरात रात्री एक वेडसर महिला फिरत होती याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्या दिशेने पोलीस तपास करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The idol of idol in Srinagar city area of ​​Warora city