शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

दंगली पेटविण्याचा होता इसिसचा डाव

By admin | Updated: July 1, 2016 05:13 IST

हैदराबाद शहरातील मंदिरांमध्ये गोमांस ठेवून दंगली पेटविण्याचा इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेचा डाव होता

नवी दिल्ली/हैदराबाद : शक्तिशाली बॉम्ब पेरून अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासोबतच हैदराबाद शहरातील मंदिरांमध्ये गोमांस ठेवून दंगली पेटविण्याचा इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेचा डाव होता, अशी धक्कादायक माहिती राष्ट्रीय तपास संस्थेच्या सूत्रांनी (एनआयए) दिली आहे.एनआयएने बुधवारी जुन्या हैदराबादेत केलेल्या कारवाईत इसिसच्या ११ संशयितांना ताब्यात घेतले होते. तपास संस्था गेल्या चारपाच महिन्यांपासून या तरुणांवर नजर ठेवून होती. अटकेतील हे तरुण इसिसचा भारतातील हस्तक शफी अरमर याच्या संपर्कात होते. २५ जूनच्या सायंकाळी त्यांचे दूरध्वनीवरील संभाषण ऐकल्यानंतर एनआयएने तातडीने कारवाई केली. या संभाषणादरम्यान एका संशयिताने दुसऱ्याला गाय आणि म्हशीच्या मांसाचे तुकडे आणण्यास सांगितले होते. गोमांसाचे तुकडे शहरातील विविध मंदिरांमध्ये टाकून दंगली घडविण्याचा त्यांचा कट होता, असे सूत्रांनी सांगितले. अटकेतील सर्व तरुण २० ते ३० वर्षे वयोगटातील असून, नोकरी करणारे आहेत. दहशतवाद्यांचा हा गट हिंसक कारवायांसाठी आयईडी तयार करीत होता आणि एका आॅनलाइन हँडलरद्वारे त्यांना आदेश दिले जात होते, अशी माहिती समोर आली आहे. इसिसचा हा हस्तक इराक अथवा सिरियामध्ये होता, असा संशय आहे.हैदराबादेतील काही तरुण आणि त्यांचे साथीदार देशाच्या विविध भागांमधील धार्मिक स्थळे आणि संवेदनशील सरकारी इमारतींसह सार्वजनिक ठिकाणांवर हल्ल्यासाठी शस्त्रास्त्र आणि स्फोटके गोळा करून भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट रचत असल्याची ठोस माहिती मिळाल्याच्या आधारे एनआयएने यापूर्वीच एक गुन्हा नोंदविला होता. (वृत्तसंस्था) >जप्त केलेले साहित्यधाडीदरम्यान शस्त्रास्त्र, गोळाबारूद, स्फोटकांच्या निर्मितीसाठी वापरली जाणारी रसायने, डिजिटल सामग्री आणि १५ लाख रुपये जप्त केले होते. याशिवाय २ सेमी आॅटोमॅटिक पिस्तुले, टेलिस्कोप लावलेली एअरगन, टारगेट बोर्ड, ६ लॅपटॉप, जवळपास ४० मोबाइल फोन, ३२ सिमकार्ड, मोठ्या संख्येत हार्डडिस्क, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह, डिजिटल टॅब आदी साहित्यही सापडले आहे.