शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धक्कादायक! तिने आणलेल्या सरपणावरच नवऱ्याने रचले तिचे 'सरण'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 18:00 IST

चारित्र्यावर संशय घेणाऱ्या गंगारामने मुक्ताबाईने जंगलातून अन्न शिजविण्यासाठी आणलेल्या सरपणाचे सरण (चिता) रचले. या सरणावर मुक्ताबाईला ढकलत डिझेल टाकून जिवंत जाळले.

ठळक मुद्देसुशी गावात घडली थरकाप उडविणारी घटनावृद्ध पत्नीला जिवंत जाळलेचारित्र्यावर घेत होता संशय

चंद्रपूर : संशय कोणत्या थराला घेऊन जाईल, याचा विचार करवत नाही. मग, नातेही क्षुल्लक वाटायला लागते. याच संशयातून एका ७४ वर्षीय इसमाने अंगणातच सरण रचून पत्नीला जिवंत जाळले.

समाजमन सुन्न करणारी ही घटना मंगळवारी दि. ४ जानेवारीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या दुसऱ्याच दिवशी मूल तालुक्यातील सुशी गावात घडली. मुक्ताबाई गंगाराम शेंडे (६५) रा. सुशी असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. गंगाराम सोमाजी शेंडे (७४) असे निर्दयी पतीचे नाव आहे.

मुक्ताबाई आणि गंगाराम शेंडे हे वृद्ध दाम्पत्य अख्खे आयुष्य एकमेकांशिवाय जगले नाही. मात्र आयुष्याच्या संध्याकाळी त्या दाम्पत्यांमध्ये संशयाने जागा केली. गंगाराम याही वयात पत्नीवर संशय घेऊ लागला. अशातच दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. नेहमीच क्षुल्लक कारण वादाचे कारण होत होते. गंगारामच्या मनात संशयाने पक्के घर केले होते.

मंगळवारी सकाळी मुक्ताबाई अन्न शिजविण्यासाठी लागणारे सरपण आणण्यासाठी लगतच्या जंगलात गेली. ही बाब गंगारामला खटकली. ती सरपण घेऊन दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास घरी परतताच गंगारामने तिच्याशी वाद घालून भांडण केले. भांडणातून त्याने तिला बेदम मारहाण केली. डोक्यात सैतान संचारल्यागत वागत असलेल्या गंगारामने मुक्ताबाईने जंगलातून अन्न शिजविण्यासाठी आणलेल्या सरपणाचे सरण (चिता) रचले. या सरणावर बळजबरीने मुक्ताबाईला टाकून तिच्या अंगावर डिझेल टाकले आणि आग लावली.

या आगीने मुक्ताबाई होरपळत होती. तिचा किंचाळण्याचा आवाज ऐकून शेजारी त्या दिशेने धावून आले. ती मदतीची याचना करीत होती. अखेर नागरिक तिच्या मदतीला धावून आले. लगेच उपचारार्थ चंद्रपूरला सामान्य रुग्णालयात हलविले. प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून नागपूरला हलविले. मात्र रात्री १ वाजताच्या सुमारास वाटेतच मुक्ताबाईची प्राणज्योत मालवली.

या प्रकरणी मूल पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून गंगाराम शेडे याला अटक केली आहे. पुढील तपास मूलचे पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड करीत आहे.

गावकरीही होते अंतर ठेवून 

गंगाराम शेंडे हा स्वभावाने अतिशय तापट होता. गावातील नागरिकांशीही त्याचे पटत नव्हते. अनेकजण त्याच्याशी अंतर ठेवूनच वागत होते. या दोघांमध्ये वाद व्हायचा. अखेर गंगारामने तापट स्वभावातून पत्नीलाच जिवंत जाळल्याची घटना घडली असल्याची चर्चा गावात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारfireआगDeathमृत्यू