वेकोलिच्या नाल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली
By Admin | Updated: September 9, 2014 23:22 IST2014-09-09T23:22:10+5:302014-09-09T23:22:10+5:30
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोवणी खुल्या कोळसा खाणीसाठी वेकोलि प्रशासनाने स्वत:च्या फायद्यासाठी मानवनिर्मित नाला तयार करून दिशा वळविली. त्यामुळे गोवरी येथील शेकडो हेक्टर

वेकोलिच्या नाल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली
हरदोना : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोवणी खुल्या कोळसा खाणीसाठी वेकोलि प्रशासनाने स्वत:च्या फायद्यासाठी मानवनिर्मित नाला तयार करून दिशा वळविली. त्यामुळे गोवरी येथील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली आल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
येथील शेतकऱ्यांनी वेकोलि प्रशासनाला वारंवार निवेदने दिली. मात्र वेकोलि अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे हजारो हेक्टरमधील शेतपीके बुडाली आहे.
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजुरा तालुक्यात वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहे. वेकोलि प्रशासनाने गोवरी परिसरातील नाल्यांची दिशा वळविल्याने अल्पशा पावसाने शेती पाण्याखाली येते. पोवनी वेकोलिने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय न घेता केवळ वेकोलिने स्वत:च्या फायद्यासाठी मानवनिर्मित नाले तयार करुन नाल्यांची दिशा वळविली. त्यामुळे गोवरी येथील शेतकरी गणपत बोढे, कान्हुजी बोढे, सुधाकर पाचभाई, सचिन पाचभाई, भास्कर लोहे, प्रभाकर बोढे, प्रभाकर लोहे, रामकिसन बोढे, अन्नाजी पाचभाई, प्रवीण पाचभाई, विठ्ठल बोढे, प्रभाकर पाचभाई, मारोती वडस्कर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेती अल्पश: पाण्यामुळे बुडत असते. पोवनी वेकोलिने काढलेला मानवनिर्मित नाल्यामुळे हाती आलेले पीक गमवावे लागत आहे. मात्र वेकोलिकडून शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई दिली जात नाही.
पोवणी ओपनकास्ट वेकोलिने नाला वळविल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. याबाबत गोवरी येथील सरपंच सुनील उरकुडे यांच्यासह शेतकऱ्यांनी आमदार, खासदार, जिल्हा प्रशासनाला निवेदन दिली. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार- तिबार पेरणी करावी लागली. परंतु दोन-तीन दिवसापासून पडलेल्या संततधार पावसामुळे पोवणी वेकोलि परिसरातील शेतकऱ्यांची पीके पाण्याखाली आली. यासाठी पोवनी वेकोलिचे नियोजनशून्य धोरण कारणीभूत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत पोवनी वेकोलि प्रबंधक जी.व्ही. एस. प्रसाद यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (वार्ताहर)