शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

नाल्याचा प्रवाह बदलल्याने शेकडो एकर शेती पाण्याखाली

By admin | Updated: June 27, 2015 01:31 IST

वेकोलिने स्वत:च्या फायद्यासाठी नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलला. कोळसा उत्खननासाठी पोवनी ...

वेकोलिचा प्रताप : शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे वाहून गेलेगोवरी : वेकोलिने स्वत:च्या फायद्यासाठी नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलला. कोळसा उत्खननासाठी पोवनी ओपनकास्टमधील मातीचे महाकाय ढिगारे नाल्याच्या किनाऱ्यावर टाकल्याने नाल्याचा प्रवाह बदलला आणि नाल्यातील पाणी शेतात शिरत असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. मात्र, या गंभीर बाबीकडे वेकोलिचे जबाबदार अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.वेकोलिच्या पोवनी ओपनकास्टने स्वत:च्या फायद्यासाठी नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह बदलल्याने थोड्या पावसानेदेखील या नाल्याचे पाणी सरळ शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे. वेकोलिने नाला वळविल्याने त्याचा नाहक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. राजुरा तालुक्यातील बल्लारपूर क्षेत्रातंर्गत येणाऱ्या वेकोलिच्या पोवनी ओपनकास्टने कोळसा खाण तयार करण्यासाठी त्या परिसरात असणाऱ्या नैसर्गिक नाल्याचे प्रवाह बदलले. कोळसा उत्खननासाठी मातीचे महाकाय ढिगारे नाल्याच्या काठावर टाकले. त्यामुळे नाल्याचे पाणी अडून सरळ शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्याने शेतीचे गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र, या गंभीर बाबीकडे वेकोलि प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. शेतकऱ्यांनी पै पै जुळवून बियाण्यांची लागवड केली. मात्र, रविवारी झालेल्या संततधार पावसामुळे या प्रवाह बदललेल्या नाल्याचे पाणी परिसरातील शेकडो एकर शेतीत गेल्याने पेरलेले बियाणे उगवण्याआधीच वाहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पोवनी ओपनकास्ट परिसरात नाल्यांच्या काठावर गोवरी येथील शेतकरी शंकर बोढे, गणपत बोढे, कुसुम बोढे, अरुण पाचभाई, अण्णाजी पाचभाई, किशोर लोहे, मधुकर लोहे, विलास लोहे, प्रभाकर बोढे, सुनील पाचभाई, सुगंधा बोढे, बाळकृष्ण लोहे, तुषार पाचभाई, संजय पिंपळकर, मारोती वडस्कर, प्रभाकर लोहे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. त्यांना दरवर्षीच हा फटका बसतो. परंतु वेकोलि प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष द्यायला तयार नाही. यावर वेकोलिने उपाययोजना करावी, यासाठी गोवरी येथील सरपंच सुनील उरकुडे यांनी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसह वेकोलिचे गोवरी क्षेत्र व्यवस्थापक परिहार, गोवरी खाण व्यवस्थापक नवले यांची भेट घेऊन चर्चा केली. चर्चेदरम्यान, योग्य तोडगा काढल्या जाईल, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले. त्यामुळे वेकोलि आता कोणता निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)