बैल पोळा उत्सवाला शंभर वर्षांची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 22:42 IST2018-09-08T22:42:26+5:302018-09-08T22:42:50+5:30
ग्रामीण भागात पोळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यांत्रिक युगात जनावरांची संख्या कमी होत आहे. परंतु या सणाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना बैलजोडीविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही. पेंढरी (कोके) येथे या सणाला यंदा शंभर वर्षे पूर्ण झाले आहेत. सामूहिक सण साजरा करण्याची ही परंपरा नवी पिढी पुढे नेण्यास सरसावली आहे.

बैल पोळा उत्सवाला शंभर वर्षांची परंपरा
लोकमत न्यूज नेटवर्क
पेंढरी कोके : ग्रामीण भागात पोळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यांत्रिक युगात जनावरांची संख्या कमी होत आहे. परंतु या सणाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना बैलजोडीविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही. पेंढरी (कोके) येथे या सणाला यंदा शंभर वर्षे पूर्ण झाले आहेत. सामूहिक सण साजरा करण्याची ही परंपरा नवी पिढी पुढे नेण्यास सरसावली आहे.
शंभर वर्र्षांपूर्वी तत्कालीन सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण शिंदे, गुलाबराव घोरपडे, नारायण सुर्यवंशी, तुकाराम शेंडे, सिताराम शेंड,े मारोती आत्राम, वारलू मेश्राम, मारोती चनुरकार, श्रावण वाढई देवाजी निकोडे, सोनबाजी नान्ने, चिरकुटा आत्राम, नामदेव चौधरी, झिबल मेश्राम आदींनी गावातील विठ्ठल रूख्मिनी व हनुमान देवस्थानच्या पारावर बैलपोळा सुरू केला. त्यावेळी पाटलांच्या दहा व इतर शेतकºयांच्या दोन अथवा तीन जोड्या अशा तिनशेपेक्षा अधिक बैल तोरण रांगेत असायचे. त्यानंतरची धुरा दुसºया फळीतील वारसदार नारायण मेश्राम, चंपत शेंडे, सखाराम शेंडे, माणिकराव गुरनुले, महादेव वाढई, पुंजाराम आत्राम, शामराव आत्राम नानाजी निकोडे, दादाजी चौधरी, चंद्रकांत शिंदे, गणपत सुर्यवंशी, तुकाराम सुर्यवंशी, पांडुरंग शेंडे, मनिराम सुर्यवंशी, रामराव आत्राम, रामाजी आंबडारे, गोपाळराव चौखे, किसन सोनुले, केशवराव गायकवाड, श्रावण चाचरकार, मनिराम चौखे, हरीजी चौखे नथ्थूजी परात, मोतीराम खंडरे, महादेव सहारे, पांडुरंग मेश्राम ही परंपरा पुढे नेली. बैल जोड्यांची संख्या दीडशे व दोनशेपर्यंत अबाधित ठेवली. तिसºया पिढीतील यादवराव मेश्राम, लिलाधर चनुरकार, गुलाबराव आत्राम, वासुदेवराव आत्राम, मंगेश शिंदे, माणिक शेंडे, रमेश शेंडे, गुरूदास आत्राम, रतिराम आत्राम, शालिकराम आत्राम, रामदास सहारे, नारायण गुरनुले, देवाजी चौधरी, देवाजी गुरनुले, रामीज चाचरकर, भगवान चौधरी, जैराम आत्राम, दौलत जनबंधू, वामन शेंडे, श्रीराम मेश्राम, यशवंत पराते, घनश्याम चौखे, पांडूरंग गुरनुले, श्रावण गुरनुले, उद्धव बावणे आदी मंडळी परंपरा चालवित आहेत. मागील वर्षी पेंढरीच्या पोळ्यात केवळ ५३ ते ५७ तर कोकेवाडा व मुरपार येथील पोळ्यात सुमारे ७५ बैलजोड्या उपस्थित होत्या.