अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मानवाधिकाराचा उपयोग व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:41 IST2018-12-11T00:41:30+5:302018-12-11T00:41:54+5:30
सामान्य माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रचलित कायद्यांसोबतच मानवाधिकार आयोग आपले कार्य बजावत असते. मानवाधिकार आयोगाबद्दल जनमाणसांमध्ये प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केले.

अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मानवाधिकाराचा उपयोग व्हावा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्र्रपूर : सामान्य माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रचलित कायद्यांसोबतच मानवाधिकार आयोग आपले कार्य बजावत असते. मानवाधिकार आयोगाबद्दल जनमाणसांमध्ये प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केले. मानवाधिकार दिनानिमित्त ज्युबिली हायस्कूलमधील कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
ज्युबिली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गांधी चौकापर्यंत रॅली काढून मानवाधिकाराचा संदेश दिला. विद्यार्थिनी मयुरी आलम हिने विचार मांडले. यावेळी मयुरी आलम व गौरव गोगे यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान केले.
शिक्षणाधिकारी (माध्य.) संजय डोर्लीकर दोरलीकर यांच्या नेतृत्वात ज्युबिली हायस्कूलचे व्ही. एम. तोडासे, खान, एस. पी. वाघमारे, एम. आर. भारसाकडे, पी.सी कोटेवार, एम. डी. मोरे, एस. टी. बर्डे, ए. पी. सुरपाम, एच. पी. धनेवार, एस. डी. बोंडे, एस. यु. उरकुडे, पी. पी मुडेवार, कोमल वारदे, वैशाली परसोडकर, अभिजित कृष्णापूरकर, गोविंद प्रसाद बनवाल उपस्थित होते. संचालन एम.आर. बारसाकडे यांनी केले.