कुटुंबाचा गाडा कसा ओढायचा, अन् स्वत:ही जगायचे कसे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2022 05:00 IST2022-01-09T05:00:00+5:302022-01-09T05:00:46+5:30
शासनामध्ये विलिनीकरण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी २९ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू केले आहे. पगारवाढ देण्याची घोषणा करूनही कर्मचारी कर्तव्यावर येण्यास तयार नसल्याने महामंडळाने सुमारे १०० च्या जवळपास कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली. तर ९५ जणांचे निलंबन केले. काही कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. मात्र तरीसुद्धा कर्मचारी आपल्या निर्णयावर ठामच आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यापासूनचे वेतन मिळाले नाही.

कुटुंबाचा गाडा कसा ओढायचा, अन् स्वत:ही जगायचे कसे ?
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे दोन महिन्यापासून कर्मचारी कर्तव्यावर जात नसल्याने बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन बंद आहे. त्यामुळे उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न आ वासून उभा आहे.
शासनामध्ये विलिनीकरण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी २९ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू केले आहे. पगारवाढ देण्याची घोषणा करूनही कर्मचारी कर्तव्यावर येण्यास तयार नसल्याने महामंडळाने सुमारे १०० च्या जवळपास कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली. तर ९५ जणांचे निलंबन केले. काही कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. मात्र तरीसुद्धा कर्मचारी आपल्या निर्णयावर ठामच आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यापासूनचे वेतन मिळाले नाही. पूर्वीच कोरोनाने आर्थिक संकट त्यातही दोन महिन्यापासून वेतन नसल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोर जावे लागत आहे. दैनंदिन गरजा भागवताना मोठी कसरत होत आहे.
पुढे काय हाेणार, काहीच कळत नाही ?
हक्काच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मात्र शासन याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. पूर्वीच तटपुंजे वेतन मिळत असल्याने काही जमा शिल्लक नाही. त्यातच दोन महिन्यापासून पगार नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरा जावे लागत आहे.
-आंदोलनकर्ता
माझ्या घरी सहा जणांचे कुटुंब आहे. मंडळाकडून मिळणाऱ्या वेतनात कुटुंब चालविताना मोठी कसरत करावी लागत होती. आता तर दोन महिन्याचा पगार झाला नाही. आता समोर कसे होणार याबाबत काहीच कळेनासे झाले आहे.
-आंदोलनकर्ता
अल्प वेतनामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे आम्ही मागील काही दिवसांपासून दुखवटा आंदोलन सुरू आहे. आंदोलनाला शासनाने बिन पगारी रजा केली आहे. त्यामुळे दोन महिन्यापासून पगार मिळाला नाही. कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
-आंदोलनकर्ता