मानव विकासच्या मोफ त पाससाठी विद्यार्थिनींचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:33 IST2017-07-18T00:33:39+5:302017-07-18T00:33:39+5:30

मुलीचे शिक्षणाचे प्रमाण वाढावे, याकरिता शासनाने इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनिना मानव विकास मिशनअंतर्गत मोफत पास योजना सुरू केली आहे.

Housewives for the passage of human development | मानव विकासच्या मोफ त पाससाठी विद्यार्थिनींचे साकडे

मानव विकासच्या मोफ त पाससाठी विद्यार्थिनींचे साकडे

मोफत पासची व्यवस्था करावी : आगार व्यवस्थापकाकडे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : मुलीचे शिक्षणाचे प्रमाण वाढावे, याकरिता शासनाने इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनिना मानव विकास मिशनअंतर्गत मोफत पास योजना सुरू केली आहे. मात्र पळसगाव हे गाव मानव विकास अंतर्गत येत नसल्याचा कारणाने विद्यार्थिनींना मोफ त पास देण्यात येत नाही. त्यामुळे आम्हाला मोफत पास द्यावा, याकरिता पाळसगाव येथील २५ विद्यार्थिंनीनी जि.प. सदस्य गजानन बुटके यांच्या नेतृत्वात आगार व्यवस्थापक आशीष मेश्राम यांना साकळे घातले.
मुलगी शिकली तर पूर्ण घर शिकते. मात्र ग्रामीण भागात मुलींचे शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. या करिता शिक्षणाच्या सोई आर्थिक परिस्थिती असे अनेक कारणे आहेत. त्यामुळे शासनाने ईयत्ता अकावी- बारावीच्या विद्यार्थिनींना मानव विकास मिशनअंतर्गत मोफत पास योजना सुरू केली. मात्र चिमूर तालुक्यातील पळसगाव येथील विद्यार्थीनी वासेरा-शिवनी येथे अकरावी-बारावी वर्गात शिक्षणासाठी जातात. गावाचा समावेश मानव मिशन मध्ये येत नसल्याने या गावातील विद्यार्थिनीना मोफ त पास देण्यात येत नाही. त्यामुळे या गावातील अनेक मुली शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
आपण शिक्षणापासून वंचित राहू नये, व आपल्याला मानव विकासच्या मोफ त पास मिळावा, याकरिता मासळ-मदनापूर जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य गजानन बुटके यांना निवेदन देवून आगार व्यवस्थापक आशीष मेश्राम यांना चक्क २५ विद्यार्थिनीनी आगार प्रमुखाचे कार्यालयासमोर मोफत पाससाठी साकडे घातले. साकडे घालणाऱ्या विद्यार्थिनीमध्ये निकीता बन्सोड, शकिला गुडघे, शिल्पा सोनवाने, योगिता मांदाडे, श्वेता रामटेके, उर्मीला महाडोरे, अकिंता मेश्राम, स्नेहा रामटेके, अंजु शहा यासहन अनेक विद्यार्थिनीचा समावेश होता.

मानव विकास योजनेत २६ गावांचा समावेश
चंद्रपूर जिल्हा आदिवासी बहुल असल्याने या जिल्यातील चिमूर तालुक्याचा समावेश मानव विकास मिशनमध्ये आहे. या तालुक्यातील २६ गावांचा समावेश शिक्षणाकरिता मानव विकास मिशनमध्ये आहे. मात्र उर्वरीत गावांचा समावेश नसल्यामुळे त्या गावातील मुलींना योजनेचा लाभ घेत येत नाही. त्यामुळे सदर योजनेपासून विद्यार्थिंनी वंचित असल्याचे चित्र दिसून येत आहे.

चिमूर तालुकयातील ७ बस या मानव विकास मिशन योजनेसाठी देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये संवर्ग विकास अधिकारी गट शिक्षणाधिकारी यानी ठरवून दिलेल्या मागणीतील विद्यार्थानाच मानव विकासचा मोफत पास देता येतो. पळसगाव-वासेरा हा मार्ग मानव विकास अंतर्गत येत नाही. त्यामुळे या गावातील विद्यार्थिंनींना मोफ त पासचा योजनेचा लाभ देता येत नाही. ज्या गावांचा समावेश असेल त्यांनाच लाभ देता येतो.
- आशीष मेश्राम
आगार व्यवस्थापक, चिमूर

Web Title: Housewives for the passage of human development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.