पावसात घर कोसळले, नुकसान भरपाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 17:13 IST2017-07-28T17:04:58+5:302017-07-28T17:13:42+5:30
राजुरा तालुक्यातील विरूर स्टे. येथे १९ तारखेला झालेल्या मुसळधार पावसात गांधीनगर वॉर्डातील भीमाशंकर गुंडलोल यांचे घर पुरते कोसळले.

पावसात घर कोसळले, नुकसान भरपाईची मागणी
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर- राजुरा तालुक्यातील विरूर स्टे. येथे १९ तारखेला झालेल्या मुसळधार पावसात गांधीनगर वॉर्डातील भीमाशंकर गुंडलोल यांचे घर पुरते कोसळले. या घटनेत जिवीतहानी झाली नसली तरी, हे कुटुंब अक्षरश: उघड्यावर आले आहे. यासंदर्भात विरुर येथील सरपंच व उपसरपंच यांनी राजुराच्या तहसीलदारांना भेट दिली व मदतीची विनंती केली असता त्यांनी ती स्वीकारली नाही. मात्र त्या कुटुंबासाठी ३५ किलो धान्याची सोय करून दिली. या भागात ६५ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला नसल्याने मदत करता येत नाही असे तहसीलदार रविंद्र होळी यांचे म्हणणे आहे. या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आर्थिक मदत करावी असे गावकºयांचे म्हणणे आहे.