हत्याकांडातील आरोपीचे घर जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:53 IST2019-06-07T00:52:53+5:302019-06-07T00:53:30+5:30

जुन्या वादातून लालपेठ परिसरात सोमवारच्या मध्यरात्री शिवा ऊर्फ गोलू व कोटा परिवारातील सदस्यांनी संजय झुणमूलवार व त्याच्या मित्रावर अचानक हल्ला चढविला होता. या हल्ल्यात संजय हा जागीच ठार तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला.

The house of the accused in the prison was burnt | हत्याकांडातील आरोपीचे घर जाळले

हत्याकांडातील आरोपीचे घर जाळले

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जुन्या वादातून लालपेठ परिसरात सोमवारच्या मध्यरात्री शिवा ऊर्फ गोलू व कोटा परिवारातील सदस्यांनी संजय झुणमूलवार व त्याच्या मित्रावर अचानक हल्ला चढविला होता. या हल्ल्यात संजय हा जागीच ठार तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. यामध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली होती. सध्या हे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान या हत्येचे सूत्रधार शिवा व कोटा परिवाराचे घर बुधवारच्या मध्यरात्री अज्ञात लोकांनी जाळले. ५०-६० लोकांचा मोठा समुदाय आरोपीच्या घरी आला होता. त्यांनीच आरोपीचे घर जाळल्याची माहिती आहे. पोलिसांनी आरोपीच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या जाळपोळ प्रकरणात शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आग लावली तेव्हा घरी कुणी नव्हते, अन्यथा मोठी जिवितहानी झाली असती. शिवाय घरात चार सिलिंडर होते.

Web Title: The house of the accused in the prison was burnt

टॅग्स :Murderfireखूनआग