घोडपेठच्या विद्यार्थ्यांनी केली तंबाखूची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:01 IST2020-02-10T05:00:00+5:302020-02-10T05:01:01+5:30
यावेळी प्राचार्य भैय्या तुराणकर, यांच्यासह शाळेतील शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत शाळा परिसरात तंबाखुजन्य पदार्थाची प्रतिकात्मक होळी करून यापासून दूर राहण्याची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले.

घोडपेठच्या विद्यार्थ्यांनी केली तंबाखूची होळी
लोकमत न्यूज नेटवर्क
घोडपेठ : तंबाखू, सिगारेट, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन शहरासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. व्यसनाला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. नाही तर त्याचे रूपांतर कर्करोगामध्ये होण्यास वेळ लागत नाही. शाळा, महाविद्यालयांतर्फे यासाठी जनजागृती केली जात आहे. अशीच जागृती घोडपेठ येथील कर्मवीर विद्यालयाने केली असून तंबाखुजन्य पदार्थांची प्रतिकात्मक होळी करून विद्यार्थ्यांना या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी प्राचार्य भैय्या तुराणकर, यांच्यासह शाळेतील शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत शाळा परिसरात तंबाखुजन्य पदार्थाची प्रतिकात्मक होळी करून यापासून दूर राहण्याची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले. याप्रसंगी प्राचार्य भैय्या तुराणकर यांनी कर्करोग होवू नये यासंबंधी घ्यावयाची काळजी याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षिका फुलसंगे यांनी कर्करोगाच्या लक्षणांविषयी माहिती दिली. या उपक्रमाला विद्यालयातील पाचवी ते बारावीचे सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
वेळीच सावध व्हा
तंबाखूजन्य पदार्थामुळे कर्करोग होतो. त्यामुळे यापासून विद्यार्थ्यांनी दूर राहणे गरजेचे आहे. यासाठी प्रथम पालकांनी आपल्या सवयी सोडल्या पाहिजे. या सवयी सोडल्या नाही तर भविष्यात त्या धोकादायक ठरू शकतात.
शाळा-महाविद्यालय परिसरात तंबाखू विक्री करणे गुन्हा आहे. असे असले तरी अनेकजण विक्री करतात. त्यामुळे शिक्षक, पालकांनी सावध राहून संबंधितांची प्रशासनाकडे तक्रार करणे गरजेचे आहे.