आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:59 IST2021-09-02T04:59:21+5:302021-09-02T04:59:21+5:30

चिमूर : ऑर्गनायझेशन फॉर राईटस् ऑफ ट्रायबल तालुका शाखा चिमूरच्या वतीने आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पंचायत समिती ...

Honoring the meritorious students of the tribal community | आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

चिमूर : ऑर्गनायझेशन फॉर राईटस् ऑफ ट्रायबल तालुका शाखा चिमूरच्या वतीने आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पंचायत समिती सभागृहात घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम, उद्घाटक म्हणून आफ्रोट संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय कुमरे तर प्रमुख अतिथी म्हणून आफ्रोटचे सचिव शंकर मडावी, नागेंद्र कुमरे चंद्रपूर, बंडू मडावी चंद्रपूर, रवी वरखडे, विलास कोयचाडे, सुनील मसराम, डॉ. राजू मडावी उपस्थित होते. सानिया पुरुषोत्तम कुमरे या विद्यार्थिनीने बारावीला ९१ टक्के व विधी अरविंद गेडाम हिने दहावीला ८७ टक्के गुण प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक होमराज सिडाम यानी केले. संचालन प्रकाश कोडापे यांनी केले.

310821\img-20210830-wa0124.jpg

आदिवासी गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार कार्यक्रम चिमुर

Web Title: Honoring the meritorious students of the tribal community