कोरोना योद्ध्याचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:29 IST2021-07-27T04:29:28+5:302021-07-27T04:29:28+5:30

कूचना : कोरोनाकाळात येथील डॉ. विश्वास यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली. त्यांच्या या कार्याची दखल ...

Honoring Corona Warrior | कोरोना योद्ध्याचा सत्कार

कोरोना योद्ध्याचा सत्कार

कूचना : कोरोनाकाळात येथील डॉ. विश्वास यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली. त्यांच्या या कार्याची दखल घेत श्री गणेश बहुद्देशीय क्रीडा मंडळ आणि श्री गणेश मंडळ कूचना यांच्या वतीने डॉ. विश्वास यांचा सत्कार करण्यात आला.

पळसगाव, नागलोन, पाटाळा, मनगाव, राळेगाव, थोराना, कूचना वस्ती, कॉलोनी येथील रुग्णाची कोरोना साथीच्या वेळी सर्दी, ताप, खोकला अशी साथही होती. त्या वेळी रोजचे शेकडो रुग्ण दवाखान्यात यायचे. सकाळी १० वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत रुग्णाची मोठ्या आपुलकीने सेवा केली. त्याच अनुषंगाने गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रीगणेश बहुद्देशीय क्रीडा मंडळ आणि श्रीगणेश मंडळ कूचना यांच्यातर्फे डॉ. विश्वास यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुदाम ठक, सुधाकर राऊत, गजानन निमकर, अतुल हेकाड, अनिल गावंडे, यश परोधे, सचिन पारखी, चेतन ताटेवार आदींची उपस्थिती होती.

260721\screenshot_20210724_105416.jpg

सत्कार करताना गणेश युवक मंडळाचे सदस्य

Web Title: Honoring Corona Warrior