उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा झाला सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST2021-03-07T04:24:26+5:302021-03-07T04:24:26+5:30

वरोरा : वरोरा व भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत इंग्लिश ई-टीच प्रकल्पाच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा सत्कार ...

Honored for his excellent work | उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा झाला सन्मान

उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा झाला सन्मान

वरोरा : वरोरा व भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत इंग्लिश ई-टीच प्रकल्पाच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा सत्कार नुकताच शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आला.

वरोरा येथील विचार विकास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत कुणाल सुलभेवार आणि स्नेहा कांबळे हे मागील तीन वर्षांपासून ई-टीच प्रकल्पाच्या माध्यमातून इंग्रजी शिक्षण देत आहे. त्यांनी कोरोना काळातही विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवले. डिजिटल आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना दिले. सुलभेवार आणि कांबळे यांच्या कार्याची दखल मोझरी येथील अपेक्षा होमिओ सोसायटी व चाइल्ड राइट अलायन्स यांनी घेतली. नुकत्याच झालेल्या सन्मान समारंभात कुणाल सुलभेवार आणि स्नेहा कांबळे यांना शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी विदर्भातील १२ जिल्ह्यांतील ३९ तालुक्यांतील शाळा समन्वयक यांचाही सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर सचिव नंदकुमार प्रा. सुभाष गवई, डॉ. मधुकर गुंबळे, डॉ. मिताली शेट्टी, डॉ. एकनाथ मोहाड, डॉ. विलास शेंडे, रंजित बोबडे, संजीवनी बरडे, डॉ. नरेंद्र पवार, संजीवनी पवार आदी उपस्थित होते.

Web Title: Honored for his excellent work