ग्रामसभा ठरावातील ५२ पात्र लाभार्थ्यांची घरकूल यादी फायलीतूनही गहाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:38 IST2021-02-05T07:38:15+5:302021-02-05T07:38:15+5:30
अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी रमाई घरकूल योजना राबविली जाते. समाजकल्याण विभागाकडून योजनेसाठी आराखडा तयार केला जातो. त्यातील पात्र लाभार्थ्याला १ ...

ग्रामसभा ठरावातील ५२ पात्र लाभार्थ्यांची घरकूल यादी फायलीतूनही गहाळ
अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी रमाई घरकूल योजना राबविली जाते. समाजकल्याण विभागाकडून योजनेसाठी आराखडा तयार केला जातो. त्यातील पात्र लाभार्थ्याला १ लाख २० हजारांचा निधी दिला जातो. नरेगामधून २० हजारांचा हातभार लावल्या जातो. पाच टप्यात हा घरकुलाचा निधी दिला जातो. जिल्हा ग्रामीण विकास यत्रंणेचे या योजनेवर नियत्रंण होते. ५ फेब्रुवारी २०१९ ला रमाबाई घरकूल योजनेसाठी ५२ अनुसूचित जातीतील कुटुबांची यादी ठराव क्रमांक - ३ नुसार उसेगाव ग्रामसभेत मंजूर करण्यात आली. या ५२ लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ मिळावा, यासाठी पंचायत समितीला शिफारस करण्यात आली होती. ठराव पंचायत समितीला उशिरा पोहाेचल्यामुळे पात्र लाभार्थ्याना घरकूल योजनेचा फायदा मिळू शकला नाही, असे पंचायत समितीचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. २०२० मध्ये पात्र लाभार्थ्यांकडून ग्रामपंचायतीने फाईल मागितल्या असता त्या पंचायत समितीला पोहाेचविल्याची सुद्धा माहिती आहे. २०२१ वर्ष लागूनही अजूनपर्यंत या ५२ लाभार्थ्यांना रमाई घरकूल योजनेचा फायदा मिळालेला नाही. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांत प्रशासनाविरूद्ध रोष व्यक्त होत आहे. चिमूर पंचायत समितीमधील गृह अभियंत्याला उसेगाव येथील रमाई घरकूल योजनेतील मंजुरी यादीबद्दल विचारले असता रमाई आवास योजनेतून एकही घर उसेगावसाठी मंजूर झाले नसल्याचे सांगितले. याबाबत चिमूर पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी संजय पुरी यांनी ही माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही. ती ग्रामसेवकांना विचारावी लागेल.