गडचांदूर व जिवती तालुक्यातील काही अति गरजू किंवा संकटात असलेल्या व्यक्तीचा फोन येताच त्यांच्या शेतात, घरी जाऊन गरजू शेतकरी, शेतमजुरांना आधार पेमेंट सिस्टमद्वारे दहा हजार रुपयापर्यंतचे विड्राॅल आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी, एचडीएफसी बँकचे केंद्रचालक उध्दव पुरी यांनी देऊन मदतीचा हात दिला. जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र द्वारा केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामस्तरावर पोहचविण्याचे नियमित काम हे केंद्र चालक करीत असतात. आरोग्य विमा, बँकिंग सेवा, दूध पुरवठा, टेली मेडिसिन सेवा, महसूल सेवा यासह अनेक अत्यावश्यक सेवा आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी घरीच सुरक्षित राहावे व खूप अत्यावश्यक सेवेची गरज भासल्यास जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र चालकांना दूरध्वनी द्वारे संपर्क केल्यास नक्कीच मदत पुरविली जाईल, अशी माहिती चंद्रपूर जिल्हा आपले सरकार सेवा केंद्राचे विनोद खंडाळे, उध्दव पुरी यांनी दिली.
आपले सरकार सेवा केंद्रातून मिळणार घरपोच सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:12 IST