घरफोडी व दुचाकी चोरणाऱ्या टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:53 IST2021-02-21T04:53:02+5:302021-02-21T04:53:02+5:30

चंद्रपूर : शहरात घरफोडी करणाऱ्या, तसेच दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी ...

Home burglary and bike theft gang arrested | घरफोडी व दुचाकी चोरणाऱ्या टोळी जेरबंद

घरफोडी व दुचाकी चोरणाऱ्या टोळी जेरबंद

चंद्रपूर : शहरात घरफोडी करणाऱ्या, तसेच दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेले सोन्यांचे दागिने, मोबाइल व दुचाकी असा एकूण दोन लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

रोहीत राजू शेट्टी (२७), प्रवीण रमेश सेट हांडी (१९), मोहम्मद इमरान शबीर शेख (३८), अमन सलीम खान (१९) असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. शहरात मागील अनेक दिवसांपासून घरफोडी व दुचाकीचोरीचे प्रमाण वाढले होते. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक संदीप कापडे यांचे एक पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने चार चोरट्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार घरफोड्या व तीन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरी करण्यात आलेले सोन्यांचे दागिने, मोबाइल, तीन दुचाकी असा एकूण दोन लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, राजेंद्र खनके, महेंद्र भुजाडे, जमिर पठाण, अलुप डांगे, संदीप मुळे, जावेद सिदीक्की आदींनी केली.

Web Title: Home burglary and bike theft gang arrested