जि.प.समोर शासन निर्णयाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:43 IST2020-12-15T04:43:57+5:302020-12-15T04:43:57+5:30
फोटो चंद्रपूर : राज्यातील मान्यताप्राप्त अंशत: आणि पूर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाºयांसाठी आकृतीबंद लागू करण्याबाबतचा ...

जि.प.समोर शासन निर्णयाची होळी
फोटो
चंद्रपूर : राज्यातील मान्यताप्राप्त अंशत: आणि पूर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाºयांसाठी आकृतीबंद लागू करण्याबाबतचा शासनाचा निर्णय पूर्णत: अन्यायकारक असून शासनाने नेमलेल्या आकृतीबंद समिती सुचविलेल्या सुचनांच्या पूर्णपणे विरोधात असल्यामुळे या निर्णयाचा सर्वच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी विरोध करीत आहे. सोमवारी शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने शासन निर्णयाची होळी करण्यात आली.
राज्यातील मान्यताप्राप्त अंशत: आणि पूर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंद लागू करून शाळांतील शिपाई पद कंत्राटी पद्धतीने करण्याचा कट रचला आहे. २००५ पासून वेळोवळी शासनाने अध्यादेश काढून आकृतीबंधाच्या नावाखाली चतुर्थ श्रेण्ी कर्मचाऱ्यांची भरती बंद ठेवलेली आहे. त्यामुळे अनेक शाळांतील ही पदे रिक्त आहेत. शासनाने हा नवा निर्णय घेऊन राज्यातील जवळपास ५२ हजार चतुर्थश्रेणी कर्मचाºयांचे घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. हा अन्याय शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना सहन करणार नाही. त्यामुळे शासनाने हा निर्णय त्वरीत रद्द करावा, अशी मागणी करीत चंद्रपूर जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालय परिसरात शासन निर्णयाची होळी केली. याप्रसंगी जिल्हा माध्यमिक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष अशोकराव पिंपळकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र खाडेकर, जिल्हा सहसचिव सुभाष गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष गणेश गेडाम, तालुका अध्यक्ष भास्कर भुरसे, अविनाश झाडे, सलिल महाजन, राजू कोटकर आदी उपस्थित होते.