शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
2
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
3
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
4
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
5
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
6
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
7
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
8
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
9
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
10
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
11
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
12
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
13
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
14
Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
15
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
16
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
17
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
18
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
19
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
20
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
Daily Top 2Weekly Top 5

कामगार विभागाच्या परिपत्रकाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 06:00 IST

पेमेंट स्लिपमध्ये किमान वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, ग्रॅच्युईटी, बोनस, सुट्यांचे पैसे इत्यादी तपशीलाचा समावेश करणे बंधनकारक आहे. परंतु मागील एक वर्षापासून महाराष्ट्रातील कोणताही शासकीय विभाग, मंडळ अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या परिपत्रकाचे पालन होताना दिसत नाही.

ठळक मुद्देजनविकास सेनेचे आंदोलन : कामगार कायद्याचे पालन करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जनविकास सेनेच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.उद्योग उर्जा व कामगार विभागाने २२ फेब्रुवारी २०१९ रोजी एक परिपत्रक काढले होते. शासकीय विभागांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन व नियमानुसार लागू भत्ते देणे अनिवार्य असल्याचे या परिपत्रकामध्ये नमूद आहे. तसेच कंत्राटदाराने प्रत्येक कंत्राटी कामगाराला दर महिन्याला पेमेंट स्लिप देणेसुध्दा आवश्यक आहे. प्रत्येक कामगाराला दिलेल्या पेमेंट स्लिपची एक प्रत विभागप्रमुखाकडे सादर केल्याशिवाय कंत्राटदाराचे देयके मंजूर करण्यात येऊ नये, असे निर्देशसुद्धा परिपत्रकांमध्ये देण्यात आलेले आहेत. तसेच कंत्राटी कामगारांची पेमेंट स्लिप विभाग प्रमुखाकडे जमा केल्याशिवाय देयके मंजूर केल्यास संबंधित विभाग प्रमुख यांच्यावर कारवाई करण्याची तरतूदसुद्धा या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेली आहे.पेमेंट स्लिपमध्ये किमान वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, ग्रॅच्युईटी, बोनस, सुट्यांचे पैसे इत्यादी तपशीलाचा समावेश करणे बंधनकारक आहे. परंतु मागील एक वर्षापासून महाराष्ट्रातील कोणताही शासकीय विभाग, मंडळ अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या परिपत्रकाचे पालन होताना दिसत नाही. उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या सदर परिपत्रकाचे सरसकट उल्लंघन करणाऱ्या अधिकारी व कंत्राटदारावर आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या किमान वेतन कायदा, पीएफ कायदा, बोनस कायदा, घरभाडे भत्ता कायदा, कंत्राटी कामगार कायदा-१९७०, बोनस कायदा इत्यादी कायद्याचा संदर्भ घेऊन सदर परिपत्रक काढण्यात आलेले आहे. त्यामुळे या कायद्यांचे व कामगार विभागाच्या परिपत्रकातील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक असतानाही शासकीय विभागांमध्ये सरसकट यांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे कंत्राटी कामगारांना किमान वेतन व इतर भत्त्यांपासून वंचित राहावे लागते. शासनाला अन्यायग्रस्त गोरगरीब कंत्राटी कामगारांसाठीच्या कायद्यांची अंमलबजावणी करायची नसेल, शासन निर्णय व परिपत्रक यांचे पालन करायचे नसेल तर असे कायदे, शासन निर्णय व परिपत्रकाचा उपयोग नाही, अशी प्रतिक्रिया जन विकास सेनेचे अध्यक्ष पप्पु देशमुख यांनी दिली.सदर आंदोलनात आकाश लोडे, इमदाद शेख, राहुल दडमल, मनिषा बोबडे, प्रफुल्ल बैरम, दिनेश कंपू आदी सहभागी झाले होते. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कामगारांना किमान वेतन देण्याची व दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी