शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
2
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
3
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
4
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
5
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
6
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
7
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
8
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
9
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
10
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
11
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
12
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

बल्लारपुरातील ऐतिहासिक किल्ल्याच्या महत्त्वात आता शिवजयंतीची भर !

By admin | Updated: February 25, 2016 00:54 IST

बल्लारपूरची ओळख आज औद्योगिक शहर अशी झाली आहे. सोबतच, या शहराला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

महत्त्व आणखी वाढले : स्वातंत्र्य व गणराज्य दिनाला होते ध्वजारोहणवसंत खेडेकर - बल्लारपूरबल्लारपूरची ओळख आज औद्योगिक शहर अशी झाली आहे. सोबतच, या शहराला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या भागात सुमारे ६०० वर्षे गोंडवंशीय राजांची सत्ता राहिली आहे. त्याकाळी बल्लारपूर (बल्लारशहा) अर्थात येथील वर्धा नदी काठावरील ऐतिहासिक किल्ल्याचे अनन्यसाधारण महत्व होते. आजही या किल्ल्याचे महत्त्व असून या ठिकाणी गणराज्य दिन, स्वातंत्र दिन, महाराष्ट्र दिन साजरा होतो. आता या ठिकाणी शिवजयंतीही साजरी करण्यास सुरूवात झाली आहे.आदिया बल्लारसिंह या शासकाने हा किल्ला बांधून या भागाला बल्लारशहा असे नाव दिले. या ठिकाणी आदिया बल्लाळसिंह ते खांडक्या बल्लारशाह (कार्यकाळ १३२२ ते १४९७) असे सात राजे होऊ गेलेत. येथील शेवटचा राजा खांडक्या बल्लारशाह याला आताच्या चंद्रपूरच्या अंचलेश्वर मंदिराच्या जागेवर चमत्कारिक अनुभव आला आणि त्याने चंद्रपूरला परकोट बांधून बल्लारशहा येथील राजधानी चंद्रपूरला हलविण्याचे ठरविले.त्याने परकोटाची पायाभरणी केली. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हिरशहा याने त्यावर परकोट बांधून चंद्रपूरला विकसित केले. यानंतर चंद्रपूरला महत्व आले ते कायमचे! बल्लारपूरच्या किल्ल्याचे गोंडकालीन साम्राज्यात असे महत्व होते. गोंड, भोसले ही राजेशाही गेली. नंतर इंग्रजांनी येऊन येथे आपली सत्ता गाजविली. हा किल्ला त्या घटनांचा साक्षीदार आहे. काळपरत्वे हा किल्ला काही ठिकाणी ढासळला असला तरी या किल्ल्याचे दोन मोठे प्रवेशद्वार, उत्तरेकडील लहान दरवाजा, नदीकडील तट आणि प्रवेशद्वार तसेच, नदी काठावरील हवेली राणी महल हे आजही मजबूत आणि चांगल्या स्थितीत आहेत. या किल्ल्याचे एकंदरीत ऐतिहासिक महत्व बघून या राष्ट्रीय वास्तू वैभवाचा सन्मान म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेने अर्थात बल्लारपूर नगर परिषदेने (न.प. पूर्वी नोटेफाईड एरिया) १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी गणतंत्र दिन, या राष्ट्रीय दिनी ध्वजारोहण करण्याची प्रथा सुरू केली. नगरपालिकेचे उपाध्यक्ष या ठिकाणी ध्वजारोहण करतात. याप्रसंगी लोकांची मोठी उपस्थिती असते. १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्य बनले. महाराष्ट्र दिनाप्रित्यर्थ किल्ल्यावर न.प. कडून उपाध्यक्ष यांचे हस्ते ध्वजारोहण करणे सुरू झाले. वर्षातून असे तिनदा ध्वजारोहण होत असते. शिवजयंती सर्वत्र साजरी केली जाते. बल्लारपूर शहरात त्याप्रसंगी मिरवणूक काढली जाते. साईबाबा मंदिरापासून ती काढली जात असे. गतवर्षीपासून स्थळात बदल करून ती आता ऐतिहासिक किल्ल्यापासून काढली जाऊ लागली आहे. शिवबाच्या अनुयायींनी येथील ऐतिहासिक किल्ल्याची शिवाजी महाराजांच्या जयंतीप्रसंगी घेतलेली ही दखल निश्चितच सुखावणारी आहे. आणि ऐतिहासिक किल्ल्यापासून मिरवणूक काढणे संयुक्तिकही ठरते. यंदा तर या मिरवणुकीचा बाज बघण्यासारखा होता. मराठमोळ्या पेहरावात महिला व पुरुषांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. किल्ल्याचे मोठे प्रवेशद्वार गर्दीने फुलले होते.