हायवा व पिकअपची समोरासमोर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST2021-03-07T04:24:33+5:302021-03-07T04:24:33+5:30
गोंडपिपरी : शहरातून जाणाऱ्या अहेरी मार्गावरील नवेगाव (वाघाडे) जवळ पिकअप आणि हायवाची समोरासमोर धडक बसली. यात हायवा चालकाच्या ...

हायवा व पिकअपची समोरासमोर धडक
गोंडपिपरी : शहरातून जाणाऱ्या अहेरी मार्गावरील नवेगाव (वाघाडे) जवळ पिकअप आणि हायवाची समोरासमोर धडक बसली. यात हायवा चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
हायवा ट्रक (क्रमांक एमएच ३४ बीजी ०९९८) राजुरा येथून विठ्ठलवाडाकडे येत असताना नवेगावजवळ पिकअप वाहनाची (क्र. एमएच ४० सीडी ००२९) धडक बसली. धडक एवढी जबर होती की, दोन्ही वाहनांची दिशाच बदलली आणि हायवाचालकाने मार्गालगत असलेल्या एका शेतात हायवा घातल्याने उभे असणारे गहू पिकाचे नुकसान झाले आहे. सामोरासमोर धडक झाल्याने दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. हायवाचालकांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याने जखमीला ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे उपचाराकरिता नेण्यात आले असून,
पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.