जिल्ह्यात रुग्ण मृत्यूचा उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:25 IST2021-04-19T04:25:43+5:302021-04-19T04:25:43+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात दरदिवशी कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. दरम्यान, मृत्यूसंख्याही दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. रविवारी एकाच दिवशी २५ जणांचा ...

जिल्ह्यात रुग्ण मृत्यूचा उच्चांक
चंद्रपूर : जिल्ह्यात दरदिवशी कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. दरम्यान, मृत्यूसंख्याही दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. रविवारी एकाच दिवशी २५ जणांचा मृत्यू झाला, तर १ हजार ५८४ बाधितांची नव्याने भर पडली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ४२ हजार २३१ वर पोहोचली आहे. सध्या १० हजार ९८१ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३ लाख २९ हजार ८४६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी दोन लाख ८० हजार १४९ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
बाॅक्स
रविवारचे मृत्यू
रविवारी मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहराच्या तुकुम येथील ४७ वर्षीय व ६३ वर्षीय पुरुष, दाताळा येथील ५८ वर्षीय महिला, गंज वाॅर्ड येथील ६८ वर्षीय पुरुष, बियाणी नगर येथील ५२ वर्षीय महिला, इंदिरानगर येथील ६५ वर्षीय महिला, सिद्धार्थ वाॅर्ड वरोरा येथील ६२ वर्षीय पुरुष, बागदेवाडी भद्रावती येथील ५० वर्षीय पुरुष, घोडपेठ भद्रावती येथील ७० वर्षीय पुरुष, नागभीड येथील ५२ वर्षीय महिला, तळोधी नागभिड येथील ५३ वर्षीय पुरुष, बल्लारपूर येथील ६० वर्षीय महिला, चिमूर येथील ८३ वर्षीय पुरुष, घुगुस येथील ५५ व ३७ वर्षीय पुरुष, चदंनखेडा भद्रावती येथील ७५ वर्षीय पुरुष, झाडे प्लॉट भद्रावती येथील ७० वर्षीय पुरुष, लाखांदूर भंडारा येथील ४० वर्षीय महिला, वडाला पायकू, ता. चिमूर येथील ७२ वर्षीय महिला, गोंडसावरी चिचपल्ली येथील ३५ वर्षीय महिला, नागभिड येथील ८२ वर्षीय पुरुष, लोनवाही तालुका सिंदेवाही येथील ५१ वर्षीय महिला, तपाल, ता. ब्रह्मपुरी येथील ३० वर्षीय पुरुष, बोंडेगाव ब्रह्मपुरी येथील ४२ वर्षीय पुरुष, वाॅर्ड नंबर १५, मूल येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
असे आहे बाधित
महानगर पालिका ४९५,
चंद्रपूर तालुका ६७
बल्लारपूर ९६
भद्रावती १२४
ब्रम्हपुरी २४०
नागभिड २७
सिंदेवाही १७
मूल ५५
सावली २२
पोंभूर्णा ०५
गोंडपिपरी ०७
राजुरा ६१
चिमूर १७३
वरोरा १४०
कोरपना २८
जिवती ०५
इतर २२