ंतळोधी येथे चौकाचौकांत सुरू आहेत दारूचे छुप्पे अड्डे
By Admin | Updated: May 15, 2015 01:09 IST2015-05-15T01:09:11+5:302015-05-15T01:09:11+5:30
१ एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारुबंदी झाली. तसे तळोधीतील दारुच्या दुकानांचे दरवाजे बंद झालेत.

ंतळोधी येथे चौकाचौकांत सुरू आहेत दारूचे छुप्पे अड्डे
तळोधी (बा.) : १ एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारुबंदी झाली. तसे तळोधीतील दारुच्या दुकानांचे दरवाजे बंद झालेत. येथील बसस्थानक तसेच रस्त्यावर सायंकाळी होणारी गर्दी कमी झाली. परंतु हे चित्र मात्र फार काळ टिकले नाही. आता येथे चौकात चौकात दारूचे अड्डे सुरू झाले आहेत.
येथील व परिसरातील परवानाधारक दुकाने बंद झाली असली तरी १५ दिवसांतच शेजारच्या राज्यातून तसेच जिल्ह्यातून विविध मार्गाने दारुची आवक सुरू झाली. त्यातून तळोधीच्या चौकाचौकांतील पानटपऱ्यांमधून व इतरही काही छोट्यामोठ्या व्यवसायिकांच्या दुकानांमधून सर्रास दारुविक्री सुरू आहे. तळोधी परिसरातील कन्हाळगाव, नांदेड, गोविंदपूर, तळोधी, सोनुर्ली यासारख्या काही गावात अल्पश: प्रमाणात दारु पकडली व दारुविक्रेत्यांना जामिनावर सोडण्यात आले. पोलिसांचे मनोबल घटले. दारुविक्रेत्यांची हिंमत वाढली. पोलिसांचे हप्त सुरू झाले. पोलिसांच्या छुप्या सहकार्यामुळे खुलेआम दारु विक्री सुरू झाली. आता दारुविक्रीची नवीन पद्धती विकसीत झाली.
तळोधी परिसरात रेल्वे, मोटारसायकल, स्कॉर्पीओ, रुग्णवाहिका, गॅस सिलेंंडरच्या माध्यमातून दारु येणे सुरू झाले. गावाबाहेर असलेली दुकाने, तणसीचे ढिगारे, आंब्याची झाडे या खाली दारुच्या पेट्या उतरणे सुरू झाले आहे. ज्यांना दारु पाहिजे त्यांनी दारु विकणाऱ्या एजंटला भेटावे. मग तो कुठेतरी फोन करणार, परत येणार, व दारु घेणाऱ्या ग्राहकाककडून दामदुप्पट किंमत घेऊन त्याला हवा असलेला ब्रँड उपलब्ध करून देणार, अशा पद्धतीने दारू विक्री सुरू आहे. (वार्ताहर)