हातठेल्याच्या भरोशावर चालतो तिचा संसाराचा गाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:26 IST2021-03-08T04:26:17+5:302021-03-08T04:26:17+5:30

महिला दिन विशेष :गडचांदूरच्या सुमित्राबाईची यशोगाथा मयूर एकरे गड़चांदूर : तालुक्यातील औद्योगिक नगरी गडचांदूर येथील सुमित्राबाई शकर नागोसे ही ...

Her chariot of the world runs on the support of the hand | हातठेल्याच्या भरोशावर चालतो तिचा संसाराचा गाडा

हातठेल्याच्या भरोशावर चालतो तिचा संसाराचा गाडा

महिला दिन विशेष :गडचांदूरच्या सुमित्राबाईची यशोगाथा

मयूर एकरे

गड़चांदूर : तालुक्यातील औद्योगिक नगरी गडचांदूर येथील सुमित्राबाई शकर नागोसे ही पतीच्या मृत्यूनंतर एकाकी पडली. मात्र ती खचली नाही. तिने जिद्दीने गडचांदुरातील शिवजी चौकात हातठेल्यावर हाॅटेल व्यवसाय सुरू केला व आत्मनिर्भर झाली.

या व्यवसायावरच तिने मुलीचे लग्न केले. मुलाचे पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. एका मुलाला नोकरीवर लावले. वाॅर्ड नं ४ मधे स्वत:च्या मालकीचे घर बांधले आहे. आशा कर्तबगार सुमित्राबाईला महिला दिनानिमित्त मानाचा मुजरा. सुमित्राबाईचे पती शंकररराव यांचे २००६ मध्ये निधन झाले. सुमित्राबाई एकाकी पडल्या. एक मुलगी, दोन मुले यांना घेऊन संसराचा गाडा यशस्वीरित्या चालवला. १९९५ पासून नागोसे दाम्पत्य शिवाजी चौकात रास्ताच्या कडेला हातठेल्यावर हॉटेल व्यावसाय चालवित होते. तोच व्यवसाय सुमित्राबाईने सुरू ठेवला. चहा, आलूभजे, वडे, पोहे विकून त्यांच्या उदरनिर्वाह सुरू आहे. सुमित्राबाई पहाटेपासूनच या व्यवसायात गुंततात. रात्री उशिरापर्यंत त्यांचे मेहनत सुरूच असते. या व्यवसायावर त्यांनी मुलीचे लग्न केले. घर बांधले. एका मुलाला नोकरी लावली, दुसऱ्याचे शिक्षण पूर्ण केले.

Web Title: Her chariot of the world runs on the support of the hand