मुसळधार पावसामुळे रस्ताच गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 05:00 AM2020-07-18T05:00:00+5:302020-07-18T05:00:31+5:30

जिल्हा खनिज विकास निधी २०१८-२०१९ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मौजा पळसगाव ते रेल्वे लाईन पांदण रस्ता सुमारे एक किलोमिटर अंतराचे खडीकरण व मजबूतीकरणासाठी ३७ लाख रुपयाचा निधी मंजूर करुन बांधकाम करण्यात आले. रस्ता बनविताना नाला असलेल्या ठिकाणी सिमेंट पाईप टाकणे गरजेचे होते. पाईप टाकण्याची मागणी गावकऱ्यांनीसुद्धा केली होती.

Heavy rains washed away the road | मुसळधार पावसामुळे रस्ताच गेला वाहून

मुसळधार पावसामुळे रस्ताच गेला वाहून

Next
ठळक मुद्देपळसगाव येथील प्रकार : शासनाचा लाखो रुपयांचा निधी व्यर्थ

लोकमत न्यूज नेटवर्क
कुचना : भद्रावती तालुक्यातील पळसगाव येथे लाखो रुपये खर्च करुन एक वर्षांपूर्वी रस्ता तयार करण्यात आला. मात्र दोन दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसाने हा रस्ताच वाहून गेला. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी व्यर्थ गेला आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
जिल्हा खनिज विकास निधी २०१८-२०१९ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मौजा पळसगाव ते रेल्वे लाईन पांदण रस्ता सुमारे एक किलोमिटर अंतराचे खडीकरण व मजबूतीकरणासाठी ३७ लाख रुपयाचा निधी मंजूर करुन बांधकाम करण्यात आले. रस्ता बनविताना नाला असलेल्या ठिकाणी सिमेंट पाईप टाकणे गरजेचे होते. पाईप टाकण्याची मागणी गावकऱ्यांनीसुद्धा केली होती. मात्र त्याकडे अभियंत्यांनी दुर्लक्ष करुन केवळ गिट्टी टाकून काम केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता पूर्ण वाहून केला. परिणामी या रस्त्यावरुन मार्गक्रमण करणे गठित जात आहे. अनेक शेतकरी तसेच इतर नागरिक या मार्गाचा वापर करतात. मात्र आता रस्ताच वाहून गेल्याने अडचण जात आहे. त्यामुळे संबंधित रस्त्याचे काम करणाºया कंत्राटदार व अभियंत्यावर कारवाई करावी, तसेच लॉकडाऊनमुळे रहदारी कमी असल्याने सदर रस्त्याचे त्वरीत बांधकाम करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

परंपरागत नाले असलेल्या ठिकाणी छोटा पूल बांधून रस्ता बांधणे गरजेचे होते. मात्र याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले. परिणामी पाण्याच्या प्रवाहाने रस्ता पूर्णपणे वाहून गेला. यासंदर्भात गावकºयांसोबत जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करणार आहोत.
- संदीप झाडे, ग्रा. पं. सदस्य, पळसगाव
 

Web Title: Heavy rains washed away the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.