रेती, गिट्टीच्या ढिगाऱ्याने नाल्या बुजल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:30 IST2021-04-23T04:30:00+5:302021-04-23T04:30:00+5:30
भिसी : येथे वॉर्ड क्रमांक-२ मध्ये राममंदिराजवळ सिमेंट रस्ता बांधून झाल्यावर सिमेंट नालीचे काम सुरू होते. ते ...

रेती, गिट्टीच्या ढिगाऱ्याने नाल्या बुजल्या
भिसी : येथे वॉर्ड क्रमांक-२ मध्ये राममंदिराजवळ सिमेंट रस्ता बांधून झाल्यावर सिमेंट नालीचे काम सुरू होते. ते अपूर्णच ठेवून ठेकेदार पसार झाला. परिणामी जुन्या नाल्या व नवीन खोदलेल्या नाल्यांमध्ये रेती, गिट्टी व मलबा साचलेला आहे. सांडपाणी जाण्यासाठी मार्गच नसल्यामुळे ठिकठिकाणी घाण पाणी साचले असून परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
नालीमधून मलबा बाहेर काढला नाही तर परिसरात मलेरिया व अन्य आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
भिसीत सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. नालीत डासांची उत्पत्ती वाढली आहे. सांडपाण्याची दुर्गंधीही वाढली आहे. त्यातच कोरोनाची दहशत. अशावेळी हिवतापाची साथ पसरणे धोकादायक ठरेल. याबद्दल ग्रामपंचायत प्रशासकाला व ग्रामसेवकाला नागरिकांनी फोन केला. पण दोन्ही अधिकारी फोन उचलत नाही, असे नागरिकांनी सांगितले. नाली बांधकाम ठेकेदाराला फोन केला तर त्यांनी माझ्या घरी लग्न आहे, मी आठ दिवस येऊ शकत नाही, तुम्ही नाली साफ करून घ्या, मी नंतर पाहून घेईन, असे उत्तर दिले. जर रोगराई पसरली तर कोण जबाबदार राहील, हा प्रश्न आहे. एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय बंद आहे .यामुळे जनता तक्रार घेऊन जाईल कुणाकडे, हाही प्रश्न निर्माण झाला आहे.