शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: February 5, 2016 00:43 IST

आदिवासी प्रकल्प विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे शासकीय आश्रमशाळेत शिकत असलेल्या मुलामुलींना पुरेशा सोयी - सुविधा तर मिळत नाही,....

प्रकल्प विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष : थंड पाण्याने करावी लागते आंघोळशंकर चव्हाण/ संघरक्षीत तावाडे जिवतीआदिवासी प्रकल्प विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे शासकीय आश्रमशाळेत शिकत असलेल्या मुलामुलींना पुरेशा सोयी - सुविधा तर मिळत नाही, त्याचप्रमाणे गरम पाणी करण्यासाठी प्रकल्प विभागाने सोलर यंत्राचे चार संच बसविले आहे. मात्र गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून हे चारही सोलर यंत्र बंद अवस्थेत आहे. विद्यार्थ्यांना आपले आरोग्य धोक्यात घालून चक्क थंड पाण्याने आंघोळी कराव्या लागत आहे.जिवती येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत पहिली ते बारावीपर्यंत शिक्षणाची सोय असून आजघडीला २८६ पटसंख्या व २६२ निवासी विद्यार्थी वसतिगृहात राहत असले तरी स्वतंत्र्य निवासाची सोय नाही. मुलींसाठी फक्त वसतिगृहाची सोय आहे. मुलांना त्याच खोलीत शिक्षणाचे धडे व तिथेच निवासाचे कार्य करावे लागते. दर्जेदार शिक्षण व निवासाची चांगली सोय पहाडावरील आदिवासी मुलांना मिळाव्यात, यासाठी आदिवासी प्रकल्प विभागाने शासकीय आश्रमशाळेची निर्मिती केली असली तरी सोयीसुविधाअभावी आश्रमशाळा समस्यांचे माहेरघर झाले आहे.शौचालयाची दुरवस्थाआश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी शौचालयाची सोय असली तरी त्यातील दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे अर्धेअधिक विद्यार्थी बाहेरच शौचविधीसाठी जात असल्याचे कळते. शौचालयावरील छताची दयनीय अवस्था झाली आहे. त्या ठिकाणच्या विद्युत तारासुद्धा उघड्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. हीच अवस्था स्नानगृहाची आहे. त्यामुळे काही मुले स्नानगृहाबाहेर उघडयावरच आंघोळ करीत असल्याचे चित्र पहायला मिळाले. जबाबदार कोणआश्रमशाळेतील सोयी-सुविधांअभावी होणारे हाल, निवासाचे प्रश्न, दूषित पाण्यामुळे होणारे आजार, लाखो रुपये खर्च करुन सोलर यंत्र बसविले. पण तेही अल्पावधीतच बंद पडल्याने विद्यार्थ्यांना थंड पाण्याने आंघोळ करावी लागते. या विविध समस्यामुळे विद्यार्थ्यांवर अनेक संकट ओढवत आहे. या प्रकाराला जबाबदार कोण?मुलीच्या वसतिगृहालगत अस्वच्छतामुली राहत असलेल्या वसतिगृहालगत व मागच्या बाजूला असलेला केरकचरा व घाणीमुळे डासांचे प्रमाण तर वाढलेच, पण साप, विंचूसारख्या प्राण्यांची भीती बाळगावी लागते. एकादी वेळेस विद्युत पुरवठा खंडित झाला तर मोठी अडचण निर्माण होत असल्याचे सांगितले जाते. वसतिगृहात व बाहेर वरांड्यात पुरेसा प्रकाश मिळेल अशी उपकरणे तर नाहीच पण प्रकल्प विभागाकडून मिळालेले जनरेटरसुद्धा बंद अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीवर आला आहे.शुद्ध पाणीही मिळत नाही शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य सृदुढ व सुरक्षित रहावे, यासाठी प्रत्येक शाळेत वॉटर फिल्टरची सोय असणे आवश्यक आहे. मात्र शाळेत वॉटर फिल्टरच नसल्याने विद्यार्थ्यांना दुषित पाण्यावरच तहान भागवावी लागते. त्यामुळे अनेकांना आजार जडत असल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले. असे असतानाही आजवर याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही, हे येथील विद्यार्थ्यांचे दुर्दैव.