संजयनगरात महिलांची आरोग्यतपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:31 IST2021-08-20T04:31:36+5:302021-08-20T04:31:36+5:30
चंद्रपूर : जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर चंद्रपूर व कार्तिकश्री फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जयलहरी काॅन्व्हेंट संजयनगर येथे ...

संजयनगरात महिलांची आरोग्यतपासणी
चंद्रपूर : जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर चंद्रपूर व कार्तिकश्री फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जयलहरी काॅन्व्हेंट संजयनगर येथे महिलांची आरोग्यतपासणी तसेच औषध वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला. शेकडो महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनसे शहराध्यक्ष मनदीप रोडे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डाॅ. नगीना नायडू, मनसे शहर सचिव सुमित करपे, डॉ. वीरेंद्र कोल्हे, महिला सेना विभाग अध्यक्ष स्वाभी राऊत, महिला सेना शाखा अध्यक्ष संगीता धात्रक, मुख्याध्यापिका चंदा जीवतोडे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉक्टर नगीना नायडू यांनी महिलांची आरोग्यतपासणी तसेच औषधांचे वितरण केले. मनसे शहराध्यक्ष मनदीप रोडे यांनी जिल्हाभर महिलांचे आरोग्यतपासणी शिबिर राबविणार असल्याचे सांगितले. शिबिरासाठी नितेश जांभुळकर, राहुल डावी आदींनी परिश्रम घेतले.