पहाडावरील गावात होणार नागरिकांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:01 IST2020-04-24T05:00:00+5:302020-04-24T05:01:32+5:30
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यालगत तेलंगणा राज्याची सिमा आहे. सिमेवर नाकाबंदी करण्यासाठी पोलिस बळ अपुरे असल्याने बंदोबस्तात असलेल्या पोलिसांवर याचा ताण पडत आहे. हा ताण कमी करण्यासाठी तहसिलदारांनी जिल्हा परिषद शाळेतील १०५ शिक्षकांना पोलिस मित्र बनवून कोरोनाची खबरदारी म्हणून त्यांना सिमेवर तैणात केले आहे.

पहाडावरील गावात होणार नागरिकांची आरोग्य तपासणी
शंकर चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश व राज्य पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून अतिदूर्गम असलेल्या जिवती तालुक्यातील नागरिकांची गावागावात जावून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी जिवतीचे तहसिलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. ही आरोग्य तपासणी तालुक्यातील ११० गावात केली जाणार असुन यासाठी सात आरोग्य पथक गठित करण्यात आले आहे. या पथकात अनुभवी डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यालगत तेलंगणा राज्याची सिमा आहे. सिमेवर नाकाबंदी करण्यासाठी पोलिस बळ अपुरे असल्याने बंदोबस्तात असलेल्या पोलिसांवर याचा ताण पडत आहे. हा ताण कमी करण्यासाठी तहसिलदारांनी जिल्हा परिषद शाळेतील १०५ शिक्षकांना पोलिस मित्र बनवून कोरोनाची खबरदारी म्हणून त्यांना सिमेवर तैणात केले आहे.
पहाडावर सर्दी, खोकला, ताप व अंगदुखीसारखे आजार नित्याचेच आहेत. मात्र सध्या कोरोनाची दहशत वाढल्यामुळे नागरिक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी करीत आहेत. ही बाब तहसिलदारांच्या लक्षात येताच ्यांनी ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. जिवती तालुक्यातील ११० गावात ही आरोग्य तपासणी केली जाणार आहे. गावातच अनुभवी डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून नागरिकांवर उपचार होणार असल्याने नागरिकांना ये-जा करण्याचा होणारा त्रास आणि आर्थिक भुर्दंडही वाचणार आहे.
आरोग्य तपासणीसाठी नियुक्ती केलेल्या पथकात वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.पी.अनखाडे, डॉ. मिलिंद वानखेडे, डॉ. अंकुश गोतावळे, डॉ. राजेंद्र अहिरकर, डॉ. अर्चना तेलरांधे, डॉ. कविता शर्मा, डॉ.आबिद शेख तसेच आरोग्य कर्मचाºयांचा समावेश असुन ग्रामपंचायत निहाय त्या-त्या गावात जाऊन आरोग्य चमू नागरिकांची तपासणी करणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून पहाडावर विविध आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
यामुळे जिवती आणि पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. ही गर्दी टाळण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
- प्रशांत बेडसे पाटील
तहसिलदार, जिवती