मुख्याध्यापकांचा आठव्या वर्गाला ठेंगा
By Admin | Updated: July 7, 2014 23:30 IST2014-07-07T23:30:21+5:302014-07-07T23:30:21+5:30
आरटीई अॅक्टनुसार जिल्हा परिषदेच्या शाळांत पाचवा आणि आठवा वर्ग सुरू करण्याचे निर्देश आहेत. माात्र अजूनही जिल्हा परिषदेच्या ६० शाळांमध्ये अद्यापही आठवा वर्गच सुरू करण्यात आला नाही.

मुख्याध्यापकांचा आठव्या वर्गाला ठेंगा
प्रशासकीय दुर्लक्ष : ६० शाळांचा समावेश
चंद्रपूर : आरटीई अॅक्टनुसार जिल्हा परिषदेच्या शाळांत पाचवा आणि आठवा वर्ग सुरू करण्याचे निर्देश आहेत. माात्र अजूनही जिल्हा परिषदेच्या ६० शाळांमध्ये अद्यापही आठवा वर्गच सुरू करण्यात आला नाही. परिसरातील खासगी संस्थाचालकांच्या स्वार्थासाठी मुख्याध्यापकांनी विद्यार्थी नसल्याचे कारण पुढे करून आठवा वर्ग सुरू केला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जिल्हा परिषदेच्या १ हजार १६३ प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहेत. या शाळांत पाचवा आणि आठवा वर्ग सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. ८२३ शाळांत पाचवा, तर ३१३ शाळांमध्ये आठवीचे वर्ग सुरू होणार होते. या वर्गांना शिकविण्याची जबाबदारी अतिरिक्त ठेवलेल्या शिक्षक, मुख्याध्यापकावर सोपविली जाणार होती. मात्र ६० शाळांतील मुख्याध्यापकांनी खासगी संस्थाचालकांपुढे नांगी टाकत वरिष्ठांकडे विद्यार्थी नसल्याचे कारण समोर केले आहे. ज्या शाळांत आठवा वर्ग सुरू होणार आहे. याच परिसरात खासगी संस्थांंच्या शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊन १५ दिवसांचा कालावधी लोटला आहे. मात्र अजूनही ६० शाळांमध्ये आठवा वर्ग सुरू झाले नाही. पाचव्या वर्गाचीही अशीच परिस्थिती आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्यांना खासगी शाळेत पुन्हा प्रवेश घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे. हे वर्ग सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी टीसी न देण्याबाबत सांगितले होते. (शहर प्रतिनिधी)