तो दरवर्षी रक्तदान करून करतो नववर्षाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:24 IST2021-01-02T04:24:29+5:302021-01-02T04:24:29+5:30
राजुरा : रक्तदान श्रेष्ठदान हे आपण नेहमी ऐकत व बघत आलो आहे. आपल्या केलेल्या रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव ...

तो दरवर्षी रक्तदान करून करतो नववर्षाचे स्वागत
राजुरा : रक्तदान श्रेष्ठदान हे आपण नेहमी ऐकत व बघत आलो आहे. आपल्या केलेल्या रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. त्यामुळे न चुकता दरवर्षी नववर्षाच्या पहिल्या दिवशी पहिला रक्तदाता म्हणून मनोज प्रकाश तेलिवार हा राजुरा येथील युवक रक्तदान करतो. हे त्याचे सलग तिसरे वर्ष ठरले.
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था राजुरा तालुका संघटक म्हणून नेहमी पर्यावरण व मानवता विकासात्मक सामाजिक उपक्रमांत हिरिरीने सहभागी होणारा मनोज दरवर्षी न चुकता पहिला रक्तदाता म्हणून रक्तदान करतो. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या रक्तकेंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे तो स्वतः जाऊन रक्तदान करतो. मनोजने यापूर्वीही १२ वेळा गरजूंना रक्त दिले आहे. कोविड -१९ सारख्या महाभयंकर जागतिक महामारीने संपूर्ण जग घाबरलेले असताना मात्र मनोज सारखा तरुण नववर्षाचे स्वागत हे रक्तदान करून करतो ही एक सकारात्मक प्रेरणा ठरत आहे.