शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

निर्बंधाचे उल्लंघन केल्याने ठोठावला पाच हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 5:00 AM

मनपा पथकामार्फत झोन क्र. ३ अंतर्गत पाहणी करताना उत्सव लॉन येथे विवाह सोहळा सुरू असल्याचे आढळून आले. विवाहासाठी ५० पेक्षा जास्त व्यक्ती असल्याचे निदर्शनास आल्यामुळे लॉन मालकाला दंड ठोठावण्यात आला. हल्दीराम रेस्टारंटचे काही कर्मचारी याआधी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आले होते. त्यामुळे मनपा आरोग्य विभागाने इतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याच्या सूचना दिल्या.

ठळक मुद्देहल्दीराम रेस्टारेंट, उत्सव लॉन तसेच दोन खासगी शिकवणी वर्गांना धडा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाने लागू केलेल्या कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन न करणाऱ्या हल्दीराम, उत्सव लॉन, इन्स्पायर कोचिंग क्लासेस, इनसाईट कोचिंग क्लासेस व इतरांवर मनपा प्रशासनाने गुरूवारी प्रत्येकी ५००० हजारांचा दंड ठोठावला तर हल्दीराम रेस्टारंटला पाच दिवस बंद ठेवण्याची ताकीद देण्यात आली आहे.मनपा पथकामार्फत झोन क्र. ३ अंतर्गत पाहणी करताना उत्सव लॉन येथे विवाह सोहळा सुरू असल्याचे आढळून आले. विवाहासाठी ५० पेक्षा जास्त व्यक्ती असल्याचे निदर्शनास आल्यामुळे लॉन मालकाला दंड ठोठावण्यात आला. हल्दीराम रेस्टारंटचे काही कर्मचारी याआधी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आले होते. त्यामुळे मनपा आरोग्य विभागाने इतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याच्या सूचना दिल्या.मात्र, चाचणी न करताच कर्मचारी कर्तव्यावर आढळले. त्यामुळे व्यवस्थापकांवर पाच हजारांचा दंड आणि पाच दिवस रेस्टारंट बंद ठेवण्याची कारवाई करण्यात       आली. शिकवणी वर्ग बंद ठेवण्याचे आदेश असताना इन्स्पायर कोचिंग क्लासेस, इनसाईट कोचिंग क्लासेस चालकांनी शिकवणी वर्ग सुरू ठेवले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे शिकवणी वर्ग संचालकांकडून पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई सहायक आयुक्त शीतल वाकडे, विद्या पाटील, डॉ. अश्विनी भारत, सुरक्षा अधिकारी राहुल पंचबुद्धे, क्षेत्रीय अधिकारी भाऊराव सोनटक्के, प्रदीप मडावी, महेंद्र हजारे आदींनी           केली. कोरोना बाधितांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून वाढ होताना दिसत असून कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक काळजीपूर्वक व काटेकोरपणे लक्ष देण्याची गरज असून यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष अपेक्षित नाही, असे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

यापुढे दंड ठोकून नियमबाह्य दुकाने सील करणारलसीकरण आणि नियमांतील शिथिलतेमुळे काही नागरिक कोरोनाबाब बेफिकीर झाले. कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. मात्र, यापुढे असा प्रकार घडल्यास मॅरेज हॉल, लॉन, हॉटेल्स, दुकाने, प्रतिष्ठानांवर दंड ठोठावून सील करण्याचे निर्देश मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी पथकाला दिले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या