भररस्त्यात दुचाकी अडवून ८४ हजार रुपये लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:31 IST2021-03-09T04:31:38+5:302021-03-09T04:31:38+5:30

नवोदिता महिला क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी नवरगाव (सिंदेवाही) या सोसायटीचा (डेली कलेक्शन) दैनिक वसुली करणाऱ्या इसमावर अज्ञात आरोपीने लोखंडी ...

He stopped the two-wheeler and looted Rs 84,000 | भररस्त्यात दुचाकी अडवून ८४ हजार रुपये लुटले

भररस्त्यात दुचाकी अडवून ८४ हजार रुपये लुटले

नवोदिता महिला क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी नवरगाव (सिंदेवाही) या सोसायटीचा (डेली कलेक्शन) दैनिक वसुली करणाऱ्या इसमावर अज्ञात आरोपीने लोखंडी पट्टीने डोक्यावर प्रहार करून त्याच्याकडील ८४ हजार ७५० रुपये चोरून पोबारा केला. ही घटना रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

दीपक दिनकर सदनपवार (४०) असे जखमी झालेल्या सोसायटीच्या एजंटचे नाव असून सध्या ते ब्रह्मपुरी येथील विद्यानगर परिसरात वास्तव्यास आहेत. रविवारी ते वडसा येथून दैनिक वसुली करून ब्रह्मपुरीकडे येत असताना ब्रह्मपुरी ते नवेगाव मक्ता यादरम्यान असलेल्या नहराजवळ अज्ञात आरोपीने हात दाखवून थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वसुली करून येत असलेल्या एजंटने आपल्या दुचाकीचा वेग कमी केला. त्यावेळी अज्ञात आरोपीने सदनपवार यांच्या डोक्यावर लोखंडी पट्टीने प्रहार केला आणि एजंटकडे असलेली पैशाची बॅग घेऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. बॅगमध्ये एकूण ८४ हजार ७५० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून ब्रह्मपुरी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Web Title: He stopped the two-wheeler and looted Rs 84,000