त्याने सापडलेले एटीएम केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:29 IST2021-04-02T04:29:18+5:302021-04-02T04:29:18+5:30

आजच्या युगात सापडलेल्या वस्तू संबंधित व्यक्तीला परत करणाऱ्या व्यक्ती समाजात फार कमी पाहावयास मिळतात. अशीच एक घटना खडसंगी शिवारात ...

He returned the ATM he found | त्याने सापडलेले एटीएम केले परत

त्याने सापडलेले एटीएम केले परत

आजच्या युगात सापडलेल्या वस्तू संबंधित व्यक्तीला परत करणाऱ्या व्यक्ती समाजात फार कमी पाहावयास मिळतात. अशीच एक घटना खडसंगी शिवारात घडली.

मौजा राळेगाव येथील युवक काही कामासाठी चिमूर येथे आलेला होता. आपले काम आटोपून गावाकडे परत निघाला. वाटेत त्याच्या जवळचे दोन एटीएम रस्त्यावर पडले.

काही अंतर दूर गेल्यावर त्याला कळले की, आपले एटीएम कुठेतरी पडले, पण तोपर्यंत सायंकाळ झाली होती. दुसरा दिवस उजाडला आणि ते एटीएम रेंगाबोडी येथील युवक मंगेश ठोबरे याला मिळाले.

मंगेशने आपल्या मोबाईलवरील सर्व व्हॉट्सॲप ग्रुपवर संदेश टाकला की, मला संबंधित ठिकाणी एटीएम मिळाले. हा संदेश त्या युवकानेही वाचला. नंतर दुसऱ्या दिवशी त्याची माहिती युवकाला देऊन ते एटीएम त्याला सुपूर्द केले.

Web Title: He returned the ATM he found