रोजगार सांभाळत तो करतो पक्ष्यांचे संवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:29 IST2021-07-30T04:29:19+5:302021-07-30T04:29:19+5:30
राजू गेडाम मूल : निसर्गातील वाढणारे प्रदूषण व त्यामुळे पशुपक्ष्यांचे धोक्यात येणारे अस्तित्व कायम राहावे, जेणेकरून निसर्गाची साखळी कायम ...

रोजगार सांभाळत तो करतो पक्ष्यांचे संवर्धन
राजू गेडाम
मूल : निसर्गातील वाढणारे प्रदूषण व त्यामुळे पशुपक्ष्यांचे धोक्यात येणारे अस्तित्व कायम राहावे, जेणेकरून निसर्गाची साखळी कायम राहील, हे हेरून आपला व्यवसाय बघत पशुपक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी राहुल धडपडताना दिसत आहे. त्यांनी गेल्या सहा वर्षांपासून पशु संवर्धनाचा जणू विडाच उचलला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्याला सन्मानित करण्यात आले आहे.
मूल - गडचिरोली महामार्गावर राहुलचा पानठेला व चहाचे दुकान आहे. या व्यवसायात काम करता करता सभोवताली असलेल्या झाडांवर येणारे पक्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकताना दिसले. त्यांनी पाण्यासाठी झाडाला घागरी बांधल्या. पाण्याच्या घागरी दिसताच पक्षी तिथे येऊ लागले. त्यानंतर राहुलचा तो नित्यक्रमच झाला. आजही अनेक पक्षी तिथे येऊन आपली तृष्णा भागवित असल्याचे दिसून येते. सन २०१०पासून सुरू केलेला हा उपक्रम गेल्या सहा वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. वृक्षप्रेमी फाऊंडेशन, सत्कार्य फाऊंडेशन, स्पॅरोताई फाऊंडेशन व अग्रणी पाणी फाऊंडेशनच्यावतीने त्याला पुरस्कृत करण्यात आले आहे.