हरणघाटच्या पाण्यासाठी शेतकºयांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 23:23 IST2017-07-29T23:23:07+5:302017-07-29T23:23:32+5:30
पावसाने दडी मारल्याने हवालदील झालेल्या शेतकºयांनी हरणघाट उपसासिंचन योजनेच्या पाण्यासाठी सिंचन उपविभाग सावली येथील....

हरणघाटच्या पाण्यासाठी शेतकºयांचे निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : पावसाने दडी मारल्याने हवालदील झालेल्या शेतकºयांनी हरणघाट उपसासिंचन योजनेच्या पाण्यासाठी सिंचन उपविभाग सावली येथील अधिकाºयांना निवेदन देवून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सावली तालुक्यात निर्माण करण्यात आलेल्या हरणघाट उपसा सिंचन योजनेचे पाणी मूल तालुक्यातील राजगड, भवराळा, चांदापूर, विरई, फिस्कुटी, बोरचांदली, जुनासुर्ला, गडीसुर्ला या आठ गावातील शेतकºयांना मिळते. सदर निवेदनात हरणघाट उपसासिंचन योजनेचे पाणी रोवण्याकरिता देण्यात यावे, या उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात येणाºया शेतकºयांवर लावण्यात आलेला पाणसारा माफ करण्यात यावा. नादुरुस्त मायनर, सबमायनर व मोरीची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी, या मागण्यासह १३ लाख रुपयांचे वीज बिल भरले नाही म्हणून शासनाने शेतकºयांची अडवणूक करण्यासाठी हरणघाट उपसासिंचन योजनेचे पाणी थांबविले, असा आरोपही काँग्रेसचे जिल्हा महासचिव व मूल पं.स.चे सदस्य संजय मारकवार यांनी केला आहे.
पावसाच्या अभावामुळे हजारो शेतकºयांचे रोवणे खोळंबले आहे. तीन वर्षापासून सतत दुष्काळाने त्रस्त झालेल्या शेतकºयांची दयनीय अवस्था झाली आहे.
त्यामुळे सदर योजनेचे पाणी त्वरित सोडण्यासाठीचे निवेदन चंद्रपूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले. येत्या चार दिवसात सदर उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.